बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

चला तर मग आपणही ट्विट करू या....

नेटवरून साभार 
अगदी मोजक्या शब्दांमध्ये, शब्दांमध्ये नाही तर मोजक्या अक्षरांमध्ये जगभरात संदेश पोहोचविणारी सुविधा म्हणून ‘ट्विटर’ ही मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट लोकप्रिय ठरली. मार्च २००६ मध्ये सुरू झालेल्या या वेबसाइटच्या सुविधा भारतामध्ये लोकप्रिय होण्यासाठी २००८ साल उजाडावे लागले. इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने झालेले बदल आणि सोशल मीडिया वापरण्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सवयींमध्ये झालेल्या बदलांमुळे जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या वेबसाइटला भारतीयांनीही लवकरच आपलेसे केले. 

भारतामधील व्यवसायवृद्धीच्या शक्यतांचा विचार करत ट्विटर कंपनीनेही भारतासाठी विशेष धोरणे आखली. त्या अनुषंगाने केवळ स्मार्टफोन वापरणाऱ्यांपर्यंतच नव्हे, तर सुरुवातीच्या टप्प्यातील साधे फिचर फोन वापरणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीही ट्विटरने वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ट्विटरने आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. त्यानुसार, स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी मोबाईल अॅप, तर फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी डाएल-अप कनेक्शनच्या माध्यमातून एसएमएसद्वारे ट्विटरच्या सेवा पुरविण्याचे धोरण ट्विटरने अवलंबिले. 

बेंगळुरू येथील ‘झिपडाएल’ या स्थानिक स्टार्टअपच्या मदतीने २०१४ च्या सुमारास ट्विटर इंडियाने ट्विटर एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून दिली. या सेवेच्या आधारे काही मोजक्या आणि महत्त्वाच्या ट्विटर अकाउंट्सवरून पुढे येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि माहितीही मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून पुरविण्यात येऊ लागली. त्यासाठी वापरकर्त्यांनी ट्विटरशी संबंधित क्रमांकावर केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे गरजेचे होते. त्यानंतर वापरकर्त्यांना मोबाईलवर एसएमएसच्या आधारे ट्विटर वापरणे शक्य झाले. 

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये १४० अक्षरांमधील संदेशांची मर्यादा ट्विटरने सध्या वाढवून २८० अक्षरांपर्यंत नेली आहे. तसेच व्हेरिफाइड अकाउंटच्या माध्यमातून विशिष्ट व्यक्तीचे ट्विटर हँडल हे अधिकृत असल्याबाबतची निळी खूण ही ट्विटरकडून दिली जात आहे. ट्विटरकडून पुरविल्या जाणाऱ्या अशा नानाविध सोयी-सुविधांनाही भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)

-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

भाई यू-ट्युब है तो सब कुछ है...

नेटवरून साभार
चॅड हर्ले, स्टिव्ह चेन आणि जावेद करिम यांनी अमेरिकेतील पेपल कंपनीसाठी ‘यू-ट्युब’ची निर्मिती केली होती. सुरुवातीपासूनच ‘यू-ट्युब’चे स्वरूप हे व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग साईट असेच राहिले आहे. करिम याने एप्रिल २००५ मध्ये तयार केलेला ‘मी अॅट द झू’ हा यू-ट्युबवरचा पहिला व्हिडिओ ठरला. या साईटला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत, २००६ साली ‘गुगल’ने ‘यू-ट्यूब’ विकत घेतले. त्यानंतरच्या काळात ‘यू-ट्युब’चा ‘गुगल’चीच एक सेवा म्हणून जगभरात प्रसार झाला. भारतामध्ये प्रत्यक्षात २००८ पासून ‘यू-ट्युब’च्या सेवा उपलब्ध होऊ लागल्या. ‘यू-ट्युब’च्याच अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरातील जवळपास ८८ देशांमध्ये आणि जवळपास तितक्याच भाषांमधील आशय यू-ट्युबवर उपलब्ध आहे. ही सेवा मुळात अमेरिकेपासून सुरू झाली असली, तरी सध्या अमेरिकेबाहेरील जगतामधून या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ कंटेन्ट उपलब्ध करून दिला जात आहे. स्थानिक भाषांमध्ये आशयनिर्मितीला मिळणारा वाढता प्रतिसाद विचारात घेत, ‘गुगल’पाठोपाठ यू-ट्युबनेही स्थानिक भाषांमध्ये असणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये २०१६ पासून यू-ट्युब स्थानिक भाषांमधील व्हिडिओ आपल्या होमपेजवरून उपलब्ध करून देऊ लागले आहे. त्यामुळे भारतातील यू-ट्युब वापरकर्त्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, तेलुगु, तमीळ या भाषांमधून उपलब्ध असणारे व्हिडिओ थेट होमपेजवर पाहण्याची सुविधा मिळू लागली आहे. त्यासाठी वापरकर्त्यांची ‘वॉच हिस्ट्री’ विचारात घेऊन, वापरकर्त्यांच्या आवडी-निवडी आणि ठिकाणाचा विचार करत त्या त्या भाषेमधील आशय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यू-ट्युबने सुरू केला आहे.   


(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

डॉ. सुनील केशव देवधर हिंदी संस्थानच्या 'सौहार्द सन्माना'चे मानकरी.


डॉ. सुनील केशव देवधर सौहार्द पुरस्काराचे मानकरी.
लखनऊ, उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान के वर्ष 2018 के पुरस्कार की घोषणा कर दी गयी है।


हिन्दी लेखन के क्षेत्र का गौरवशाली भारत-भारती सम्मान - रु0 5.00 लाख (रु0 पांच लाख) डाॅ. उषा किरन खान, पटना को दिया जायेगा।
लोहिया साहित्य सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख)

डाॅ. मनमोहन सहगल, पटियाला, 
हिन्दी गौरव सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख) 
डाॅ. बदरी नाथ कपूर, वाराणसी, 
महात्मा गांधी साहित्य सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख)
श्री श्रीभगवान सिंह, भागलपुर, 
पं. दीनदयाल उपाध्याय साहित्य सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख) डाॅ. ओम् प्रकाश पाण्डेय, लखनऊ, 
अवन्तीबाई साहित्य सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख)
डाॅ. (श्रीमती) कमल कुमार, दिल्ली, 
राजर्षि पुरुषोत्तमदास टण्डन सम्मान - रु0 4.00 लाख (रु0 चार लाख) मणिपुर हिन्दी परिषद, इम्फाल को दिया जायेगा।

8- साहित्य भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
(1) जगतगुरु रामानन्दाचार्य (स्वामी रामभद्राचार्य),
(2) डाॅ. सुरेश प्रकाश शुक्ल, लखनऊ 
(3) श्री रामदेव लाल 'विभोर', लखनऊ
(4) डाॅ. आद्या प्रसाद द्विवेदी, गोरखपुर
(5) डाॅ. पूरन चन्द टण्डन, नई दिल्ली
(6) श्री सुरेश बाबू मिश्र, बरेली
(7) श्री वीरेन्द्र आस्तिक, कानपुर
(8) डाॅ. प्रताप नारायण मिश्र, बाराबंकी
(9) डाॅ. रामसनेही लाल शर्मा 'यायावर', फिरोजाबाद
(10) डाॅ. सूर्यपाल सिंह, गोण्डा 
(11) श्री चन्द्रिका प्रसाद कुशवाहा, उन्नाव 
(12) डाॅ. इन्दीवर पाण्डेय, वाराणसी
(13) डाॅ. शशि तिवारी, आगरा
(14) श्री नवनीत मिश्र, लखनऊ
(15) श्री जगदीश तोमर, ग्वालियर
(16) डाॅ. बद्री प्रसाद पंचोली, अजमेर
(17) डाॅ. भगवान शरण भारद्वाज, बरेली
(18) डाॅ. उषा चैधरी, लखनऊ
(19) डाॅ. श्यामसुन्दर दुबे, दामोह, मध्य प्रदेश
(20) श्री अशोक अग्रवाल, हापुड़ 
9-  लोक भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
डाॅ. शांति जैन, पटना
10- कला भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 श्री मनोज कुमार सिंह, गाजियाबाद
11- विद्या भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 डाॅ. जगमोहन सिंह राजपूत, नोएडा 
12- विज्ञान भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 डाॅ. प्रेमचन्द स्वर्णकार, दामोह, मध्य प्रदेश
13- पत्राकारिता भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
डाॅ. रमेश चन्द्र त्रिपाठी, लखनऊ
14- प्रवासी भारतीय हिन्दी भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 डाॅ. उदय नारायण गंगू, माॅरिशस
15- हिन्दी विदेश प्रसार सम्मान - रु0 2,00,000=00 (रु0 दो लाख)
 डाॅ. बंडार मेणिके विजयतुंग, श्रीलंका
16- बाल साहित्य भारती सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 (1) डाॅ. भैरूलाल गर्ग, भीलवाड़ा
 (2) श्री सूर्यकुमार पाण्डेय, लखनऊ
(3) श्री संजीव जायसवाल 'संजय', लखनऊ
17- मधुलिमये साहित्य सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 डाॅ. वेदप्रकाश पाण्डेय, गोरखपुर
18- पं. श्रीनारायण चतुर्वेदी साहित्य सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 श्री रणविजय सिंह, गोरखपुर
19- विधि भूषण सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
श्री ब्रजकिशोर शर्मा, दिल्ली

20- सौहार्द सम्मान - रु0 2.00 लाख (रु0 दो लाख)
 (1) डाॅ. सुनील देवधर, पुणे, महाराष्ट्र (मराठी)
(2) डाॅ. एच.एम. कुमार स्वामी, मैसूर, कर्नाटक (कन्नड़)
(3) प्रो. आजाद मिश्र, लखनऊ (संस्कृत)
(4) डाॅ. (श्रीमती) टी.सी. वसन्ता, हैदराबाद (तेलुगु)
(5) श्री राजेन्द्र सिंह टोकी, लुधियाना (पंजाबी)
(6) डाॅ. (श्रीमती) अहिल्या मिश्र, हैदराबाद (मैथिली) 
(7) डाॅ. पी लता, तिरुवनन्तपुरम (मलयालम)
(8) श्रीमती अलमेलू कृष्णन, चेन्नई (तमिल)
(9) डाॅ. वेद कुमारी घई, जम्मू (डोंगरी)
(10) डाॅ. चन्द्रशेखर, दिल्ली (उर्दू)  
(11) प्रो. राधाकान्त मिश्र, भुवनेश्वर (उड़िया)
(12) श्री अग्निशेखर, जम्मू (कश्मीरी)
(13) डाॅ. बंशीधर शर्मा, बड़ौदा (गुजराती)
(14) डाॅ. भूपेन्द्र राय चैधरी, गुवाहाटी (असमिया)
(15) श्री ज्ञान प्रकाश टेकचंदानी 'सरल'  (सिंधी)
21- मदन मोहन मालवीय विश्वविद्यालयस्तरीय सम्मान - रु0 1,00,000=00 (रु0 एक लाख)
 (1) डाॅ. विजय कर्ण, लखनऊ
(2) डाॅ. रश्मि कुमार, लखनऊ

वर्ष 2018 में प्रकाशित पुस्तकों पर नामित पुरस्कार पुरस्कार धनराशि रु. 75,000=00 (रु. पचहत्तर हजार)
क्र. पुरस्कार का नाम विधा पुस्तक का नाम लेखक का नाम
1. तुलसी पुरस्कार महाकाव्य धराबोधि सम्राट: पृथु श्री देवेन्द्र 'देव' मिर्जापुरी, बुलंदशहर
2. जयशंकर प्रसाद पुरस्कार खण्डकाव्य सीता: एक नारी  श्री प्रताप नारायण सिंह, गाजियाबाद 
3. विजयदेव नारायण साही पुरस्कार कविता बोल रहा हूँ श्री अमित कुमार मल्ल, कानपुर
4. निराला पुरस्कार गीत/मुक्तक नदी जो गीत गाती है श्री शिवानन्द सिंह 'सहयोगी', मेरठ
5. दुष्यंत कुमार पुरस्कार  ग़ज़ल कोई पत्थर नहीं है हम  श्री अशोक रावत, आगरा
6. महावीर प्रसाद द्विवेदी पुरस्कार निबंध मानस चिन्तन डाॅ. चन्द्रपाल शर्मा, पिलखुआ 
7. भारतेन्दु हरिश्चन्द्र पुरस्कार नाटक भारत भगिनी निवेदिता डाॅ. अनिल मिश्र एवं 
प्रो. शीला मिश्र, लखनऊ
8. प्रेमचन्द पुरस्कार उपन्यास महारानी हासेपसुत श्री सुधीर निगम, कानपुर
9. यशपाल पुरस्कार कहानी बलमा जी का स्टूडियो सुश्री सोनी पांडेय, आजमगढ़ 
10.
रामचन्द्र शुक्ल पुरस्कार आलोचना भारतीय नारीवाद स्थिति और सम्भावना डाॅ. क्षमा शंकर पाण्डेय, प्रयागराज


11. सच्चिदानन्द हीरानन्द वात्स्यायन  'अज्ञेय' पुरस्कार यात्रा-वृतान्त/  संस्मरण/ रेखाचित्रा/डायरी पवन ऐसा डोलै... श्री राकेश तिवारी, लखनऊ
12. पाण्डेय बेचन शर्मा 'उग्र' पुरस्कार आत्मकथा/ जीवनी किसान का बेटा डाॅ. कृष्ण बिहारी पाण्डेय, प्रयागराज 
13. हरिशंकर परसाई पुरस्कार व्यंग्य जनतंत्रा की माया  श्री संजय सिंह, गाजियाबाद
15. मलिक मुहम्मद जायसी
 पुरस्कार अवधी
 सुगंधा  श्री राम लखन शुक्ल, प्रयागराज
16. श्रीधर पाठक पुरस्कार ब्रजभाषा ब्रज बाल गीत श्री भोजराज सिंह 'भोज', हाथरस
17. राहुल सांकृत्यायन पुरस्कार भोजपुरी अइसन आज कबीर कहाँ डाॅ. कमलेश राय, मऊ
18. मैथिलीशरण गुप्त पुरस्कार  बुन्देली भारत में बुन्देली भाषा का व्याकरण एवं साहित्यिक अनुशीलन  श्री राधाचरण गुप्त 'चरण', औरैया
19. सूर पुरस्कार   बाल साहित्य हम बच्चे नन्हे-मुन्ने सुश्री सुनीता सिंह, लखनऊ 
20. कबीर पुरस्कार राष्ट्रीय एकता एवं भावनात्मकता समन्वय सम्बन्धी साहित्य सर्वेश्वरी  डाॅ. ओम प्रकाश दुबे 'प्रकाश', लखनऊ
21. सुब्रह्मण्य भारती पुरस्कार साहित्यकारों द्वारा अन्य भारतीय भाषाओं से हिन्दी में अनूदित कृति पर गीता सतसई  डाॅ. रामकृपाल 'कृपाल', जालौन
22. बाबू विष्णुराव पराड़कर पुरस्कार  पत्राकारिता वेब पत्राकारिता श्री अरविन्द कुमार सिंह, लखनऊ
23. सरस्वती पुरस्कार मासिक/ द्वैमासिक/
त्रौमासिक पत्रिकाआंे पर कला वसुधा सम्पादक डाॅ. उषा बनर्जी, लखनऊ
25. हजारी प्रसाद द्विवेदी पुरस्कार संस्कृति खिलौनों का सामाजिक एवं मनोवैज्ञानिक अध्ययन श्री प्रताप नारायण शुक्ल, अयोध्या 
27. गिरिजादेवी पुरस्कार  ललित कला/ संगीत देशज कला  डाॅ. हृदय गुप्त, कानपुर
28. मदन मोहन मालवीय पुरस्कार शिक्षा महात्मा गांधी का शिक्षा-चिंतन डाॅ. रश्मि श्रीवास्तव, लखनऊ
29. गोविन्द वल्लभ पंत पुरस्कार  अर्थशास्त्रा प्रबन्ध एक मानवीय संकल्पना श्री मधुसूदन त्रिपाठी एवं 
श्री विनायक त्रिपाठी, 
हापुड़

30. डाॅ. भीमराव अम्बेडकर पुरस्कार  विधि तथा विधिशास्त्रा अन्तर्राष्ट्रीय संगठन: एक परिचय डाॅ. अशोक कुमार राय, अयोध्या
31. आचार्य नरेन्द्र देव पुरस्कार इतिहास भारतीय गिरमिटिया मजदूर और उनके वंशज श्री दिनेश चंद्र श्रीवास्तव, जबलपुर 
32. गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार राजनीतिशास्त्रा राजनीतिक सिद्धान्त के नवीन पक्ष प्रो. श्रीप्रकाश मणि त्रिपाठी, गोरखपुर 
33. सम्पूर्णानन्द पुरस्कार  प्रविधि जैव प्रौद्योगिकी  श्री संदीप कुमार तिवारी, भदोही
34. के.एन. भाल पुरस्कार गणित/भौतिक/ रसायन 
जल संसाधन गहराता संकट  श्री कृष्ण कुमार मिश्र, मुम्बई
35. बीरबल साहनी पुरस्कार वनस्पति/ प्राणिशास्त्रा
आदिवासी औषधीय व आर्थिक वनस्पति बौद्धिक सम्पदा श्री आनन्द प्रकाश, लखनऊ
36. पं. सत्यनारायण शास्त्राी पुरस्कार चिकित्सा विज्ञान स्वास्थ्य संहिता  डाॅ. सुभाष चन्द्र गुरुदेव, लखनऊ
37. बालकृष्ण शर्मा 'नवीन' पुरस्कार युवा लेखन (35 वर्ष तक के लेखकांे हेतु) लल्ला और बिट्टी श्री शिव मोहन यादव, कानपुर देहात 
38. महादेवी वर्मा पुरस्कार समस्त विधाओं में केवल महिला साहित्यकारों की कृति पर मैं कुन्ती तो नहीं  डाॅॅ. मंजु शुक्ल, लखनऊ 

वर्ष 2018 में प्रकाशित पुस्तकों पर सर्जना पुरस्कार - पुरस्कार धनराशि रु0 40,000=00 (रु0 चालीस हजार)
क्र. पुरस्कार का नाम विधा पुस्तक का नाम  लेखक का नाम
1. अयोध्या सिंह उपाध्याय 'हरिऔध' पुरस्कार महाकाव्य शौर्य वंदन  श्री रवीन्द्र नाथ तिवारी, लखनऊ
2. आनन्द मिश्र पुरस्कार खण्डकाव्य प्रताप  श्री केदारनाथ शुक्ल, कानपुर 
3. नरेश मेहता पुरस्कार  कविता धुँधलका श्री दीनानाथ शुक्ल 'अमिताभ', सिद्धार्थनगर
4. बलबीर सिंह 'रंग' पुरस्कार गीत/मुक्तक  पतझर में कोंपल  डाॅ. मंजु लता श्रीवास्तव, कानपुर
5. अदम गांेडवी पुरस्कार ग़ज़ल वादियाँ गुमसुम दिशाएँ मौन  श्री मदन मोहन 'अरविन्द', मथुरा
6. गुलाब राय पुरस्कार निबंध घुमक्कड़ी की दिहाड़ी  श्री अनूप शुक्ल, कानपुर 
7. मोहन राकेश पुरस्कार नाटक बामियान के बुद्ध डाॅ. अनूप सिंह, बुलंदशहर
8. अमृतलाल नागर पुरस्कार उपन्यास महानिर्वात में कोलाहल  श्री तरुण निशांत, लखनऊ

9. रामप्रसाद विद्यार्थी 'रावी' पुरस्कार कहानी चैतन्यमयी सुश्री उषा सिसोदिया,
 लखनऊ
10. रामबिलास शर्मा पुरस्कार आलोचना तुलसी और रामचरित मानस  डाॅ. नरेश कुमार गौड़ 'अशोक', प्रयागराज
11. जगदीश गुप्त पुरस्कार
 यात्रा-वृतान्त/ संस्मरण/रेखाचित्रा अमेरिका और 45 दिन  सुश्री सोनरूपा विशाल, बदायूँ
12. विष्णु प्रभाकर पुरस्कार  आत्मकथा/जीवनी अपनी ही रोशनी में रौशन  सुश्री रौशन एहतशाम, गोरखपुर
13. शरद जोशी पुरस्कार व्यंग्य पंचरतंत्रा की कथाएँ सुश्री इन्द्रजीत कौर, लखनऊ 
14. भोलानाथ तिवारी पुरस्कार भाषा/भाषा विज्ञान माँ हिंदी श्री संजीव कुमार गंगवार, नई दिल्ली
15. वंशीधर शुक्ल पुरस्कार अवधी महुआरी श्री सतीश आर्य, गोण्डा
17. भिखारी ठाकुर पुरस्कार भोजपुरी अग्निसम्भव श्री आनन्द सन्धिदूत
(श्री आनन्द कुमार श्रीवास्तव)
19. सोहन लाल द्विवेदी पुरस्कार  बाल साहित्य जादुई चश्मे डाॅ. मंजरी शुक्ला, लखनऊ
20. नज़ीर अकबराबादी पुरस्कार राष्ट्रीय एकता एवं भावनात्मकता समन्वय सम्बन्धी साहित्य वन चले राम रघुराई  श्री रामसागर शुक्ल, लखनऊ
21. काका कालेलकर पुरस्कार साहित्यकारों द्वारा अन्य भारतीय भाषाओं से हिन्दी में अनूदित कृति पर यक्ष का संदेश  डाॅ. गोपाल नारायन श्रीवास्तव, लखनऊ
22. धर्मवीर भारती पुरस्कार पत्राकारिता श्रद्धांजलि श्री विजय शंकर पाण्डेय, प्रयागराज
23. धर्मयुग पुरस्कार मासिक/द्वैमासिक/ त्रौमासिक पत्रिकाआंे पर कविताम्बरा  सम्पादक
श्री हीरालाल मिश्र मधुकर
24. नन्द किशोर देवराज पुरस्कार धर्म/दर्शन महाभारतमणि आचार्य पण्डित उमाशंकर मिश्र 'रसेन्दु', मिर्जापुर
25. विद्यानिवास मिश्र पुरस्कार  संस्कृति बारहमासा सुश्री अनिता अग्रवाल, गोरखपुर
30. आचार्य परशुराम चतुर्वेदी पुरस्कार विधि तथा विधिशास्त्रा तीन तलाक की मीमांसा  श्री अनूप बरनवाल, प्रयागराज


31. ईश्वरी प्रसाद पुरस्कार इतिहास आजाद हिंद फौज डाॅ. राहुल, नई दिल्ली 
(श्री राममोहन श्रीवास्तव), 
35. आचार्य रघुवीर प्रसाद त्रिवेदी पुरस्कार वनस्पति /प्राणिशास्त्रा लघु बनोपज डाॅ. हरजीत सिंह, 
नई दिल्ली
36. डाॅ. सतीश चन्द्र राय पुरस्कार  चिकित्सा विज्ञान कैंसर क्यों, कैसे व चिकित्सा  डाॅ. शिवप्रसाद त्रिपाठी (आयुर्वेदाचार्य), हरदोई
37. डाॅ. रांगेय राघव पुरस्कार युवा लेखन 
(35 वर्ष तक के लेखकांे हेतु) दिनकर काव्य संग्रह  श्री दिनकर चतुर्वेदी, उन्नाव 
38. विद्यावती कोकिल पुरस्कार समस्त विधाओं में केवल महिला साहित्यकारों की 
कृति पर माॅरिशस नींव से निर्माण तक  डाॅ. नूतन पाण्डेय,
नई दिल्ली
हरिवंश रायबच्चन युवा गीतकार सम्मान - धनराशि रुपये 25,000=00 (पच्चीस हजार)
विधा पुस्तक का नाम रचनाकार का नाम
वर्ष 2018 में प्रकाशित गीत/मुक्तक/ हिन्दी गजल/छन्दबद्ध कविता गीतों की वीथिका में सुश्री रश्मि शाक्य, गाजीपुर
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

‘सोशल’ मीडिया हेही राजकारणच!


‘लोकनीती’ आणि ‘सीएसडीएस’ने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भाने ‘सोशल मीडिया आणि राजकीय वर्तन’ या संकल्पनेवर सर्वेक्षण केले. विशिष्ट मते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे, असे अनेक निष्कर्ष त्यातून समोर आले आहेत. कॅनेडियन माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांनी मांडलेला ‘मीडियम इज दी मेसेज’ हा मूलमंत्र सोशल मीडियाच्या वापरालाही लागू पडतो आणि सोशल मीडिया वापरणे हेही एक राजकारणच आहे, हे त्यातून अधोरेखित होत आहे.
..........
प्रसारमाध्यमांच्या तत्त्वज्ञानाच्या विशेष संदर्भाने कॅनेडियन माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांना तसे ‘दादा’च मानले जाते. माध्यमांच्या तत्त्वज्ञानाविषयीची महत्त्वाची मांडणी असलेला ‘अंडरस्टँडिंग मीडिया - दी एक्स्टेन्शन्स ऑफ मॅन’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला, त्याला आता साधारण पन्नास वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. याच मॅकलुहान बाबांनी नव्या जगाला मीडियाविषयीचा एक मूलमंत्रही देऊन ठेवला आहे - ‘मीडियम इज दी मेसेज’ - अर्थात, माध्यम हाच संदेश! हा मूलमंत्र आजच्या सोशल मीडियाच्या काळातही तितकाच लागू आहे. हे मॅकलुहान बाबा जरी तिकडचे सातासमुद्रापारच्या कॅनडातले असले, तरी त्यांनी मानवजातीला त्या काळीच ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये वगैरे नेऊन बसवले होते. म्हणजे त्या अनुषंगाने आपण त्या वेळीही त्यांना जवळ होतो नि आताही. त्यामुळे त्यांचा हा सिद्धांत आपल्याला लागू होण्याला तशा भौगोलिक सीमा वगैरेंचे बंधनही तसे नाही. आपल्याकडे आता सोशल मीडियावर आधारलेल्या राजकारणाच्या चर्चांना चांगलाच वेग मिळाला आहे. सोशल मीडियाचा राजकारणावर परिणाम होतो की नाही, होत असेल तर तो कसा आहे आणि नसेलच तर तो का नाही, आदी मुद्द्यांशी संबंधित नानाविध तर्कवितर्क केले जात आहेत. अशा तर्कवितर्कांना दिशा देणारे काम मॅकलुहान बाबांच्या त्या मूलमंत्रामध्ये आहे. हे आत्ता असे समोर येण्याचे कारण म्हणजे आपल्याकडे नुकतेच सोशल मीडिया आणि राजकारणाच्या संदर्भाने झालेले एक ताजे सर्वेक्षण.


‘लोकनीती’ आणि ‘सेंटर फॉर दी स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ने (सीएसडीएस) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या विशेष संदर्भाने ‘सोशल मीडिया आणि राजकीय वर्तन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्षही संस्थेने जाहीर केले आहेत. त्यासाठी देशभरात प्रत्येक टप्प्यातील लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. २६ राज्ये आणि त्यातल्या २११ मतदारसंघांमधून २४ हजार २३६ मतदारांच्या मुलाखती घेतल्यानंतर या सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे राष्ट्रीय पातळीवर विचारात घेण्यात आले आहेत. त्या अर्थाने हे काम निश्चितच व्यापक असे आहे. सर्वेक्षणामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्युब हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि व्हॉट्सअॅप हे सोशल मेसेजिंग अॅप यांच्या वापराच्या अभ्यासावर भर देण्यात आला होता. त्यानुसार, देशभरातील एकूण मतदारांपैकी एक तृतीयांश मतदारांपेक्षा थोडे जास्त मतदार ही व्यासपीठे वापरताना दिसतात. त्याच वेळी उर्वरित दोन तृतीयांश लोक ही व्यासपीठे वापरत नाहीत, असे हे सर्वेक्षण सांगते. सध्याच्या घडीला फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. या दोन्ही व्यासपीठांच्या वापरामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये खूप मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या जवळपास एक तृतीयांश मतदार या व्यासपीठांचा वापर करत आहेत. ट्विटर सर्वांत कमी लोकप्रिय असले, तरीही २०१४च्या तुलनेत त्याच्या वापरात सहा पट वाढ झाली आहे.

समाजातील वरच्या जातीतील व्यक्तींचे सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगत आहेत. दलित वा भटक्या समुदायांच्या सोशल मीडिया वापराच्या तुलनेमध्ये हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या वापरामध्येही उच्चवर्णीयांचे प्रमाण अधिक आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. दलित व आदिवासींच्या तुलनेत उच्चवर्णीयांचा, तसेच महिलांच्या तुलनेत पुरुषांचा स्मार्टफोनचा वापर अधिक आहे. सुशिक्षित शहरी तरुण मतदारांनी सोशल मीडियाचे अवकाश व्यापले आहे. त्याच वेळी कमी शिकलेल्या, तुलनेत वयस्कर, ग्रामीण व महिला मतदारांची सोशल मीडिया वापराबाबतची संख्याही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली आहे, असे हे सर्वेक्षण सांगत आहे. विशिष्ट मते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे. सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्यांच्या तुलनेत तो वापरणाऱ्यांची मते अधिक स्पष्ट आणि तीव्र स्वरूपाची दिसून आल्याचे या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. याशिवाय इतर काही राजकीय मुद्देही या सर्वेक्षणातून समोर आले आहेत; मात्र सध्या हे मुद्दे बाजूला ठेवून माध्यमाचा प्रकार, अर्थात ‘मीडियम’ याच एका मुद्द्यावर आपण भर देत आहोत.

मॅकलुहान यांच्या ‘मीडियम इज दी मेसेज’ या मूलमंत्राच्या मांडणीनुसार, माध्यमांमधील संदेश नव्हे, तर माध्यमेच मानवी कृती व क्रियांना आकार देण्याचे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत राहतात. माध्यमामधून कोणत्या प्रकारचा संदेश वा अर्थ प्रसारित होत आहे, यापेक्षाही अधिक महत्त्वाचे काय असेल, तर ते म्हणजे त्या माध्यमाचाच प्रकार. इथे आपण बोलत आहोत, ते केवळ ‘सोशल मीडिया’ या माध्यमांच्या विशिष्ट प्रकाराविषयी. या माध्यमप्रकाराचा होणारा वापर, सर्वेक्षणाच्या आधाराने समोर येत असलेले आणि हा माध्यम प्रकार वापरणारे वेगवेगळे गट, सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या काही धारणा (अगदी मर्यादित स्वरूपात) हे सारे आपल्याला काही विशिष्ट मांडणी सांगू पाहत आहे. त्या अनुषंगाने सोशल मीडिया हाच संदेश मानला, तर या संदेशाची उकल ही एक नवी मांडणी ठरेल. कदाचित ती कोणाला उच्चवर्णीयांशी अधिक संबंधित अशी वाटू शकेल किंवा ती कोणाला अधिक सुस्पष्टतेकडे नेणारीही भासू शकेल. सध्या आपण ज्या राजकीय चौकटीमधून या बाबींचा विचार करत आहोत, त्या अनुषंगाने कदाचित ‘सोशल मीडिया वापरणे हेही राजकारण’ ठरू शकेल. राजकारणविषयक चौकटीतून मॅकलुहान यांच्या मांडणीचा विचार करताना, सोशल मीडियामधून पुढे जाणारे राजकीय संदेश वा त्यांचे राजकीय अर्थ, याहीपेक्षा महत्त्वाचे ठरणार आहे ते त्यांचे ‘सोशल मीडिया’पण. सोशल मीडियावरून आपल्यासमोर येणारे राजकीय संदेश, त्यांचे राजकीय अर्थ हे आपल्यासाठी नवे नसतात; मात्र ते सोशल मीडियाच्या आधाराने नावीन्यपूर्ण पद्धतीने आपल्यासमोर आल्याने अधिक रंजक वाटतात. हा तो सगळा खेळ.

सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करणे हेच मुळी एक राजकारण ठरते आहे, ती एक राजकीय कृती ठरते आहे, ती याचमुळे. अगदी वेळप्रसंगी एखादा संदेश प्रसारित करण्यासाठी इतर सर्व माध्यमांना बाजूला सारत, केवळ सोशल मीडिया याच माध्यमप्रकाराची निवड केली जाते. ही कृती होत असताना त्यामध्ये संदेश नव्हे, तर माध्यम म्हणून सोशल मीडिया व्यासपीठांचे वेगळेपण विचारात घेतले जाते. राजकीयदृष्ट्याही तसे करणे वा न करणे हे संबंधित राजकारणाला गती देणारे वा ती गती रोखणारे ठरू शकते. इथेही ‘मीडियम इज दी मेसेज’चा मूलमंत्र तितकाच लागू होतो. वैयक्तिक पातळीवर, तुमची राजकीय मते नेमकी कोणती आहेत, ती कोणत्या बाजूला झुकलेली आहेत, तुम्ही नेमके कोण आहात हे जाहीरपणे सांगण्याची सुविधा फेसबुकसारख्या व्यासपीठांवरून उपलब्ध आहे. आपली स्वतःची इतरांना हवी तशी ओळख तयार करण्याची संधीही या सोशल मीडियाने तुमच्या-आमच्यासमोर आयती आणून ठेवली आहे. यापूर्वी अशी संधी अगदीच नव्हती असे नाही; मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी सध्याच्या तुलनेत कित्येक पट खर्चिकही होत्या नि त्या तितक्याच वेळखाऊही होत्या. बरं, केवळ तेवढेच नाही. तुमची माध्यमकर्मींसोबतची ऊठबस, त्यांच्यासोबतची जवळीक हाही मुद्दा यापूर्वीच्या काळात महत्त्वाचा ठरत असे. आता तसे राहिलेले नाही. सोशल मीडियाच्या वेगळेपणाचा नि त्याच्या वैशिष्ट्यांचा महत्त्वाचा भाग म्हणून आपण सर्वांनीच हे मुद्दे हळूहळू स्वीकारलेही आहेत नि त्याचा आपल्याला हवा तसा वापरही सुरू केला आहे.

सोशल मीडिया वापरून तुम्ही तुमची राजकीय ओळख स्वतः निर्माण करू शकता, तुम्ही तुमची नसलेली राजकीय मतेही इतरांसमोर तुमचीच राजकीय मते म्हणून मांडू शकता आणि त्या आधारावर तुम्हाला हवा असणारा परिणामही अनुभवू शकता. म्हटले तर तुम्ही एक प्रकारे राजकारण खेळताय किंवा तुम्ही सोयीस्कर पद्धतीने त्यातून बाजूला राहून आजूबाजूच्या गोंधळाची मजा घेताय. कोणत्याही विचारसरणीचा वा पक्षाचा आधार न घेता हे सर्व समोर येत राहिले, तर त्यामध्ये राजकारण आहे, असे कोणी सहसा म्हणणार नाही. सर्वसामान्यांसाठी हे तसे राजकीयदृष्ट्या अराजकीयच ठरेल; मात्र त्याच वेळी मानवी स्वभाव, या स्वभावधर्मानुरूप आपोआप होणारे आणि जाणीवपूर्वक केले जाणारे आचरण वा त्यातील बदल, त्या आधारे निर्माण होणारे नातेसंबंध आणि गोतावळा, जवळच्या-लांबच्या गोतावळ्यानुसार त्यामध्ये संदेशांची होणारी देवाणघेवाण, त्यामधील औपचारिकता-आपुलकी-त्रोटकपणा, अशा सर्व मुद्द्यांच्या आधाराने अगदी एखादा मेसेज कोणाला फॉरवर्ड करायचा आणि कोणाला नाही, काय लाइक करायचे आणि काय शेअर करायचे, याचा घेतला जाणारा निर्णय हे सारे एका व्यापक राजकारणाचाच भाग बनून जाते. त्यासाठी तो मेसेज नव्हे, तर माध्यम म्हणून पुन्हा सोशल मीडियाचाच विचार होतो. पर्यायाने मॅकलुहान बाबांच्या त्या ‘मीडियम इज दी मेसेज’च्या मूलमंत्राचाच आपण विचार करू लागतो. सोशल मीडिया आणि राजकारणाच्या विशेष संदर्भाने ही बाब ‘‘सोशल’ मीडिया हे राजकारणच’ या मुद्द्यावर येऊन थांबते आहे.

आता राहता राहिला तो मुद्दा म्हणजे आपल्या निवडणुकांसाठीच्या सोशल मीडियाच्या वापराचा आणि त्या आधारे चालणाऱ्या राजकारणाचा. सोशल मीडियाचा वापर हेही राजकारणच आहे, हे व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच्या टप्प्यावर निवडणुकांसाठी वापरला जाणारा सोशल मीडिया आपण अधिक व्यापकपणे समजून घेऊ शकतो. त्याविषयीचे मुद्दे अधिक चर्चेला येण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियामुळे राजकारणाला मिळालेली गती, तुलनेने कमी खर्चात होणारा वेगवान प्रचार नि म्हटले तर कोणाचेही नियंत्रण नसलेल्या प्रचारयंत्रणांच्या फौजा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एक सोशल मीडियातज्ज्ञ नेमण्याची कृती सरकारी पातळीवरून केली गेली. सोशल मीडियाचे परिणाम गांभीर्याने विचारात घेण्यासाठी म्हणून हे एक सकारात्मक पाऊल ठरते; मात्र या पातळीवर सोशल मीडियाचे वेगळेपण समजून घेऊन निवडणुक कार्यासाठीचे विश्लेषण करू शकतील असे तज्ज्ञ उपलब्ध होणे, ही एक महत्त्वाची गरज ठरणार आहे. अशा तज्ज्ञांमार्फत केवळ राजकीय उमेदवारांच्या अधिकृत सोशल मीडियावरून पुढे येणाऱ्या राजकीय संदेशांचे विश्लेषण होणे, हे एक मर्यादित स्वरूपाचे पाऊल ठरू शकते. सोशल मीडियाची माध्यम म्हणून असणारी वैशिष्ट्ये समजून घेणे, त्याचा राजकीय संदेशांसाठी जाणीवपूर्वक होणारा वापर समजून घेणे, त्यावरून संदेशांची निर्मिती व प्रसारणाचे टप्पे समजून घेणे हे यापुढील काळात निवडणुकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे उपयुक्त पर्यायी टप्पे ठरू शकतात.

पारंपरिक माध्यमांमध्ये उपलब्ध नसलेल्या शेकडो तांत्रिक सुविधा सोशल मीडियाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या भोवतीने राजकारण फिरत असताना या सुविधांचा तितक्याच खुबीने वापर होत राहणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राजकारणासाठीचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा विचार करताना, या सर्व प्रक्रियांसाठी केवळ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवरच लक्ष ठेवणे, हे या माध्यमाची ताकद समजून न घेण्याचा प्रकार ठरू शकते. उमेदवारांच्याच जोडीने गरजेनुसार उमेदवारांसाठी म्हणून सोशल मीडिया सांभाळणारे तज्ज्ञ व त्यांचे मित्रमंडळ, अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यासाठी मदत करणारे मार्गदर्शक, पाठीराखे यांच्या सोशल मीडिया वापराच्या प्रकारांचा आढावाही निवडणूक यंत्रणांना या पुढील काळात घ्यावा लागणार आहे. वेळप्रसंगी अशा सर्वांची जबाबदारी निश्चित करण्याची भूमिकाही निवडणूक यंत्रणांना पार पाडावी लागेल. सोशल मीडियाधारित राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये एकीकडे अधिकृत पेजवर आचारसंहितेचे पालन करून प्रचार थांबू शकतो, तर दुसरीकडे भलत्याच कोणत्या तरी पेजवरून प्रचारासाठी सक्रिय राहून निवडणूक यंत्रणांच्या नजरेत धूळफेक केली जाऊ शकते. इंग्रजी स्पेलिंग्ज वापरून अधिकृत पेज तयार करणे व देवनागरीतील नावांच्या मदतीने फॅनक्लब्सची जंत्री सुरू ठेवण्यासारखे प्रकारही याच पंगतीमध्ये जाऊन बसणारे आहेत. सोशल मीडिया हेच राजकारण मानले, तर आपल्याला या माध्यमप्रकाराच्या वैशिष्ट्यांमध्ये शिरणे का गरजेचे ठरते, याची ही अगदी मोजकी कारणे आहेत. सोशल मीडिया वापरणे हेही एक राजकारणच आहे, हे आपल्याला व्यापक अर्थाने समजून घ्यावे लागणार आहे, हेच यातून अधोरेखित होत राहील.
--------------------------
सदर लेख BytesofIndia.com वरून साभार.
‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5275408055408734433
---------------------------------------------------
- योगेश बोराटे
Mobile: 9975220225 
ई-मेल : borateys@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)

या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

भाई 'लिंक्डइन' कनेक्ट किया क्या...

केवळ व्यावसायिक क्षेत्रासाठी म्हणून सुरू झालेले पहिले सोशल मीडिया व्यासपीठ म्हणून २००३ मध्ये ‘लिंक्डइन’ या सोशल मीडिया नेटवर्कची सुरुवात झाली. या व्यासपीठावर तुम्ही संपर्कात असलेल्या व्यक्तीला तुम्ही वैयक्तिक पातळीवरही ओळखता या एका गृहितकाच्या आधारे या व्यासपीठाचे काम सुरू झाले होते. ‘लिंक्डइन’वर स्वतःचे प्रोफाइल असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांना अपेक्षित असलेल्या उमेदवारांविषयीची आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या स्वरुपांविषयीची माहिती या व्यासपीठावर इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. 
तसेच, वैयक्तिक वापरकर्ते आपल्या स्वतःच्या शैक्षणिक पात्रता, आवडी- निवडीचे विषय आणि कौशल्यांची माहिती आपल्या वैयक्तिक प्रोफाइलवरून इतरांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. 
या माहितीच्या आधारे नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे अशा दोन्ही गटांमधील आपल्या वापरकर्त्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम ‘लिंक्डइन’वरून होत राहते. 
सुरुवातीच्या काळात वापरकर्ते उमेदवार स्वतःचा रेझ्युमे या व्यासपीठावर पोस्ट करून, प्रायव्हेट मेसेजिंगच्या सहाय्याने कंपन्या वा इतर उमेदवारांशी संपर्क करू शकत होते. 
कालांतराने ग्रुप्स, प्रश्नोत्तरे, अॅडव्हान्स्ड प्रोफाइल, रियल-टाइम अपडेट्सची सुविधा आदी बाबींची उपलब्धता या व्यासपीठाने करून दिली. 
सोशल मीडियाच्या इतर व्यासपीठांवर फोटो, व्हिडिओ शेअर करण्यावर भर असल्याचे आपण अनुभवू शकतो. 
‘लिंक्डइन’च्या व्यासपीठावर हा भर अनुभवायला मिळत नाही. त्याऐवजी आपल्या संपर्कामध्ये असलेल्या व्यक्तींच्या व्यावसायिक भागिदाऱ्या, व्यावसायिक प्रगती, बढत्या, संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत सुरू असलेल्या नानाविध योजना आपण या व्यासपीठावरून अनुभवू शकतो. 
या कंपनीने सन २००९ मध्ये भारतामध्ये एक स्वतंत्र कार्यालय सुरू केले. त्यानंतरच्या काळात या कंपनीने भारतीयांसाठी म्हणून काही विशिष्ट सेवांचीही सुरुवात केली. 
त्या आधारे भारतात या व्यासपीठाचा वापर करणारे ४ कोटी २० लाखांवर वापरकर्ते तयार झाले आहेत. 
या व्यासपीठाला वाढता प्रतिसाद पाहून सन २०१६ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘लिंक्डइन’च्या सर्व सेवा आपल्या छताखाली विकत घेतल्या.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

आता फेसबुक नंतर मायस्पेस...? मायस्पेसचा मोठ्ठा स्पेस...

विविध कला प्रकारांविषयी समान रुची असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणत संबंधित क्षेत्राचे भवितव्य घडविण्यासाठी व्यापक प्रयत्न करणारे एक आभासी सामाजिक व्यासपीठ म्हणून ‘मायस्पेस’ची एक स्वतंत्र ओळख आहे. ‘मायस्पेस’च्या व्यासपीठावर तुम्हा- आम्हाला अगदी समोरच दिसणारी बाब म्हणजे वेगवेगळ्या कलाप्रकारांचे होणारे सादरकीरण आणि अशा जगभरातील कलाप्रकारांचा आस्वाद घेण्याची मिळणारी संधी. जगभरातील कलाकार आपल्या नवनवीन कलाविष्कारांविषयीचे फोटो, व्हिडिओ आणि इतर संबंधित माहिती या व्यासपीठावर इतरांसाठी उपलब्ध करून देत राहतात. ‘वर्ल्ड्स लार्जेस्ट डिजिटल म्युझिक लायब्ररी’ म्हणूनही मायस्पेस आपल्याला स्वतःची ओळख करून देत राहते. वेगवेगळे संगीतकार, डिझायनर, लेखक, छायाचित्रकार यांना एकमेकांशी आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रेक्षक- ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ख्रिस डीवुल्फ याने ‘मायस्पेस’ची सुरुवात केली होती. मात्र या व्यासपीठाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेत अमेरिकेत ‘न्यूज कॉर्पोरेशन’ या संस्थेने कालांतराने ही कंपनी विकत घेतली. भारतामध्ये २००८ पासून या सोशल मीडिया व्यासपीठाच्या विविध सेवांना सुरुवात झाली. या कंपनीने सुरुवातीला भारतातील ‘क्रिएटिव्ह कम्युनिटी’ आणि वेगवेगळ्या कलांचे सादरीकरण करणारे कलाकार आपल्या व्यासपीठाकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. या व्यासपीठाच्या वापरकर्त्यांना स्वतःच्या प्रोफाइलचा चेहरा-मोहरा स्वतःच तयार करण्याची मुभा मिळते. केवळ या व्यासपीठावर उपलब्ध असलेल्याच नव्हे, तर व्यासपीठाचा वापर न करणाऱ्या कलाकारांचे व्हिडिओही वापरकर्ते ‘मायस्पेस’साठी म्हणून ‘एम्बेड’ करू शकतात. या व्यासपीठाने प्रत्येक कलाकाराला वैयक्तिक प्रोफाइलमध्येच ब्लॉगचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘मायस्पेस’वर प्रोफाइल तयार करताना तुम्ही इतरांनाही त्यासाठीचे निमंत्रण देऊ शकता. संबंधिताने त्याचा स्वीकार केल्यानंतर त्यांचे मित्र-मंडळही तुमच्या ‘एक्स्टेंडेड कॉन्टॅक्ट्स’चा भाग बनते.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

खरंच फेसबुकविषयी तुम्हाला हे माहिती नाही...!

जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाइट म्हणून सध्या ख्यातील असलेल्या ‘फेसबुक’ची सुरुवात २००४ मध्ये झाली. मार्क झुकरबर्ग याने आपल्या मित्रांच्या मदतीने या वेबसाइटची सुरुवात केली. सुरुवातीला केवळ एक प्रकल्प म्हणून सुरू झालेल्या ‘फेसबुक’ला विद्यापीठीय पातळीवरील विद्यार्थ्यांचे नेटवर्क म्हणून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांमध्येही या वेबसाइटच्या सेवा लोकप्रिय होत गेल्या. 
  • २००५ च्या सुमाराला या सोशल नेटवर्किंग साइटच्या सुविधा जगभरात उपलब्ध होऊ लागल्या. 
  • या वेबसाइटला मिळणारा प्रतिसाद विचारात घेत, २००६ पासून शैक्षणिक संस्था वगळता जगभरातील सर्वसामान्य लोकांसाठीही या सेवा खुल्या करण्यात आल्या. 
  • स्वतःचे प्रोफाइल तयार करणे, एकमेकांना माहिती सांगणे, जाणून घेणे, त्यामध्ये गरजेनुसार बदल करणे, नवनवीन मित्र-मैत्रिणी जोडणे, फोटो- व्हिडिओ एकमेकांसाठी उपलब्ध करून देणे आदी बाबी या व्यासपीठाने उपलब्ध करून दिल्या. 
  • या सर्व सेवा वापरण्यातील सहजतेमुळे अगदी नवशिकेही या वेबसाइटच्या प्रेमात पडले. 
  • मित्र- मैत्रिणींचे जाळे वाढविण्यापासून ते त्यांना गिफ्ट्स पाठविणे, त्यांच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती पोस्ट करणे, वेगवेगळे ग्रुप्स चालविणे, फेसबुकच्या आधाराने स्वतःचे असे वेगळे अॅप्लिकेशन्स तयार करणे अशा नानाविध सुविधा या व्यासपीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. 
  • २०१४ मध्ये भारतामध्ये दहा कोटींहून अधिक व्यक्तींनी ‘फेसबुक’वर नोंदणी केल्याची माहिती फेसबुकच्या अधिकृत अहवालांमधून सांगण्यात आली होती. 
  • वर्ष २०१७ मध्ये ‘फेसबुक’वरील भारतीय ‘अॅक्टिव्ह युजर’ चा आकडा २४ कोटी दहा लाखांवर गेला होता. 
  • हा आकडा अमेरिकेतील वापरकर्त्यांपेक्षाही जास्त होता. 
  • या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. 
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

ऑर्कुट बकटेनचा 'हॅलो' प्रवास

‘गुगल’ने जानेवारी २००४ मध्ये ‘ऑर्कुट’ची सुरुवात केली होती.‘ गुगल’च्या सेवेत असलेल्या ऑर्कुट बयकटेन या तंत्रज्ञाने एका प्रकल्पासाठी म्हणून या व्यासपीठाची निर्मिती केली होती.
  • प्रोफाईल, अल्बम, टेस्टिमोनिअल्ससारख्या सोयींच्या बरोबरीने वापरकर्त्यांच्या वेगवेगळ्या दिवसांच्या घडामोडींची-आठवणींविषयीची नोंद ठेवू शकणारी ‘स्क्रॅबबुक’ ही सुविधाही या व्यासपीठावर उपलब्ध होती. 
  • ‘फेसबुक’ लोकप्रिय होण्यापूर्वीच्या काळातील सोशल मीडियाचे नंबर एकचे व्यासपीठ म्हणून ‘ऑर्कुट’चा विचार केला जात होता. 
  • २००५ ते २००८ या दरम्यानच्या कालखंडामध्ये वय वर्षे १८ ते २५ या वयोगटातील व्यक्तींसाठी ‘ऑर्कुट’ हे एक हक्काचे व्यासपीठ बनले होते. 
  • भारतामध्ये साधारण त्या दरम्यानच्याच काळामध्ये डिजिटल सेवा वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ अनुभवायला मिळत होती.
  • २००७ साली ‘गुगल’ने ‘ऑर्कुट’ वापरणाऱ्यांसाठी हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु या सहा भाषांचा समावेश केला होता.
  • या दरम्यानच्या काळामध्ये ‘ऑर्कुट’वर जवळपास १८.७ दशलक्ष भारतीयांनी नोंदणी केली होती. 
  • २०१० पासून मात्र ‘फेसबुक’ने भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेत आपला भारतीय अध्याय सुरू केला. 
  • ‘गुगल’ने आपले स्वतःचे ‘गुगल प्लस’ हे सोशल मीडिया व्यासपीठ सुरू करण्याचा निर्णयही ‘ऑर्कुट’ला दुबळा करणारा ठरला.
  • अखेर २०१४ मध्ये हे व्यासपीठ बंद करत असल्याची घोषणा ‘गुगल’ने केली. 
  • त्यापूर्वीच भारत आणि ब्राझिल या दोन देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या व्यासपीठावर जवळपास ३०० दशलक्ष व्यक्तींनी आपले सदस्यत्त्व नोंदविलेले होते. 


२०१८ मध्ये ‘हॅलो’ या नव्या एका व्यासपीठाच्या आधाराने ‘ऑर्कुट’सारख्याच आणखी काही सुविधा घेऊन भारतीयांच्या सेवेत उतरत असल्याची घोषणा ‘ऑर्कुट’चा निर्माता ऑर्कुट बयकटेन याने केली. त्यासाठीची पूर्वतयारीही पूर्ण झाली आहे. 

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

'हाय 5' मीडिया @Yogesh Borate

नेटवरून साभार
भारतीय वंशाच्या रामू यमलंची यांनी २००३ साली 'हाय5' हे सोशल मीडिया व्यासपीठ सुरू केले. भारतीयाने सुरू केलेले आणि मोठ्या प्रमाणावर व्याप्ती असलेले हे पहिलेच व्यासपीठ ठरले होते. त्या काळात ‘मायस्पेस’ आणि ‘फेसबुक’पेक्षाही या व्यासपीठावर भारतीयांची संख्या मोठी होती. तुमचे स्वतःचे प्रोफाईल, प्रोफाईल पिक्चर, युजर नेम अशा बाबींचा या व्यासपीठावर समावेश होता. आपल्या प्रोफाईलचे रंग, बॅकग्राउंड बदलण्याची सुविधाही या व्यासपीठावर मिळत असे. फेसबुकच्या जोडीने ‘फार्मव्हिले’ हा ऑनलाइन गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध होण्यापूर्वी ‘हाय5’ च्या जोडीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या व्यासपीठावर आपल्या थेट संपर्कात असलेले केवळ आपलेच मित्र नव्हे, तर मित्रांचे मित्र आणि मित्रांच्या मित्रांचे मित्रही तुम्ही कोणताही वेगळा शोध न घेता पाहू शकता. अमेरिका वगळता इतर युरोपियन आणि आशियायी देशांमध्ये या व्यासपीठाचा मोठा वापर होता. ‘ऑर्कुट’ आणि ‘फेसबुक’चा वापर वाढल्यानंतरच्या काळामध्ये या व्यासपीठाचा वापर कमी होत गेला. सध्या अॅपच्या आधाराने मोबाईलवरूनही हे व्यासपीठ वापरता येते.   

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

संस्कारक्षम व मूल्यात्मक शिक्षणाची गरज : विनोद शिरसाठ

इंद्रायणी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा                                       
शिक्षक प्राध्यापकांशी संवाद साधताना विनोद शिरसाठ
शिक्षणाच्या संदर्भात गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. यापुढे गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव, ही आपल्या देशाची सर्वात महत्वाची समस्या असल्याचे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. ते आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'शिक्षक कृतज्ञता समारंभा'चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, "आपल्याकडे आंतरविद्याशाखीय शिक्षणाची खरी गरज आहे. आपल्या विषयाची मुळे ही इतर विद्याशाखेत गुंतलेली असतात, हे आपल्या लक्षात येत नाही. आज अनेक विषयांचा आंतरिक संबंध तपासणे गरजेचे असल्याचे नमूद केले."

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मावळभूषण कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष श्री. मुकुंदराव खळदे, कार्यवाह श्री. रामदास काकडे, खजिनदार श्री. चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एल. शिंदे, प्रा. ए. आर. जाधव, श्री. शैलेशभाई शहा, महाविद्यालय व विद्यापीठ विकास समिती सदस्य सौ. निरपा कानिटकर, श्री. वसंतराव भेगडे, श्री. शाळीग्राम भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी केले. यावेळी संस्थेच्या कार्यची ओळख करून देत शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.  पाहुण्यांची ओळख डॉक्टर संदीप कांबळे यांनी करून दिली.
संस्थचे अध्यक्ष मावळभूषण श्री. कृष्णराव भेगडे यांनी शिक्षक दिनासंबंधी आपली कृतज्ञता व्यक्त करून आपण नोकर आणि आम्ही मालक नसून आपण सर्वजण एका कुटुंबातील सदस्य असल्याचे उदगार काढून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी संस्थेच्या विविध शाखेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्राचे वितरण करण्यात आले. 
पुरस्कारार्थीमध्ये,
सौ. लता मोहिते, श्री. राजेश शेटे, श्री. नाटक आनंदा, श्री. ढोरे नामदेव, श्री. सुबोध गरुड, श्री. ज्ञानेश्वर शेलार, प्रा. नेहा जगताप, प्रा. वर्षा ढोबळे, प्रा. गीता घंटी, प्रा. प्रीती मनोहरन, प्रा. अश्विन देशमुख, प्रा. सावळेराम गावडे, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा. गाडेकर मॅडम, प्रा. एम. एल. कडू, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. विद्या भेगडे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एस. शिंदे यांचा समावेश आहे. 
शिक्षक कृतज्ञता समारंभानिमित्त पुरस्कार प्राप्त शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी
यावेळी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या 'प्रिय दिगेश' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित प्रिय दिगेश पुस्तकाच्या प्रकाशनाचा क्षण...
प्रा. प्रीती मनोहर, प्रा. राजेंद्र आठवले, प्राचार्य बी. बी. जैन यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. 
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मुकुंदराव खळदे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना " वाचन हा आपल्या विकासाचा पाया आहे, तो अधिक विकसित करण्याची आज गरज आहे. वाचनाने माणसाच्या बुध्दीचा विकास होतो, म्हणून रोज काहीतरी वाचत रहा" असे नमूद केले. 
यावेळी संस्थेच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार उपप्राचार्य ए. आर. जाधव यांनी मानले तर प्रा. एस. पी. भोसले व प्रा. डी. एम. कण्हेरीकर यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf