रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

आता फेसबुक नंतर मायस्पेस...? मायस्पेसचा मोठ्ठा स्पेस...

विविध कला प्रकारांविषयी समान रुची असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणत संबंधित क्षेत्राचे भवितव्य घडविण्यासाठी व्यापक प्रयत्न करणारे एक आभासी सामाजिक व्यासपीठ म्हणून ‘मायस्पेस’ची एक स्वतंत्र ओळख आहे. ‘मायस्पेस’च्या व्यासपीठावर तुम्हा- आम्हाला अगदी समोरच दिसणारी बाब म्हणजे वेगवेगळ्या कलाप्रकारांचे होणारे सादरकीरण आणि अशा जगभरातील कलाप्रकारांचा आस्वाद घेण्याची मिळणारी संधी. जगभरातील कलाकार आपल्या नवनवीन कलाविष्कारांविषयीचे फोटो, व्हिडिओ आणि इतर संबंधित माहिती या व्यासपीठावर इतरांसाठी उपलब्ध करून देत राहतात. ‘वर्ल्ड्स लार्जेस्ट डिजिटल म्युझिक लायब्ररी’ म्हणूनही मायस्पेस आपल्याला स्वतःची ओळख करून देत राहते. वेगवेगळे संगीतकार, डिझायनर, लेखक, छायाचित्रकार यांना एकमेकांशी आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रेक्षक- ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ख्रिस डीवुल्फ याने ‘मायस्पेस’ची सुरुवात केली होती. मात्र या व्यासपीठाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेत अमेरिकेत ‘न्यूज कॉर्पोरेशन’ या संस्थेने कालांतराने ही कंपनी विकत घेतली. भारतामध्ये २००८ पासून या सोशल मीडिया व्यासपीठाच्या विविध सेवांना सुरुवात झाली. या कंपनीने सुरुवातीला भारतातील ‘क्रिएटिव्ह कम्युनिटी’ आणि वेगवेगळ्या कलांचे सादरीकरण करणारे कलाकार आपल्या व्यासपीठाकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. या व्यासपीठाच्या वापरकर्त्यांना स्वतःच्या प्रोफाइलचा चेहरा-मोहरा स्वतःच तयार करण्याची मुभा मिळते. केवळ या व्यासपीठावर उपलब्ध असलेल्याच नव्हे, तर व्यासपीठाचा वापर न करणाऱ्या कलाकारांचे व्हिडिओही वापरकर्ते ‘मायस्पेस’साठी म्हणून ‘एम्बेड’ करू शकतात. या व्यासपीठाने प्रत्येक कलाकाराला वैयक्तिक प्रोफाइलमध्येच ब्लॉगचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘मायस्पेस’वर प्रोफाइल तयार करताना तुम्ही इतरांनाही त्यासाठीचे निमंत्रण देऊ शकता. संबंधिताने त्याचा स्वीकार केल्यानंतर त्यांचे मित्र-मंडळही तुमच्या ‘एक्स्टेंडेड कॉन्टॅक्ट्स’चा भाग बनते.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा