बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

भाई 'लिंक्डइन' कनेक्ट किया क्या...

केवळ व्यावसायिक क्षेत्रासाठी म्हणून सुरू झालेले पहिले सोशल मीडिया व्यासपीठ म्हणून २००३ मध्ये ‘लिंक्डइन’ या सोशल मीडिया नेटवर्कची सुरुवात झाली. या व्यासपीठावर तुम्ही संपर्कात असलेल्या व्यक्तीला तुम्ही वैयक्तिक पातळीवरही ओळखता या एका गृहितकाच्या आधारे या व्यासपीठाचे काम सुरू झाले होते. ‘लिंक्डइन’वर स्वतःचे प्रोफाइल असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांना अपेक्षित असलेल्या उमेदवारांविषयीची आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या स्वरुपांविषयीची माहिती या व्यासपीठावर इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. 
तसेच, वैयक्तिक वापरकर्ते आपल्या स्वतःच्या शैक्षणिक पात्रता, आवडी- निवडीचे विषय आणि कौशल्यांची माहिती आपल्या वैयक्तिक प्रोफाइलवरून इतरांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. 
या माहितीच्या आधारे नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे अशा दोन्ही गटांमधील आपल्या वापरकर्त्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम ‘लिंक्डइन’वरून होत राहते. 
सुरुवातीच्या काळात वापरकर्ते उमेदवार स्वतःचा रेझ्युमे या व्यासपीठावर पोस्ट करून, प्रायव्हेट मेसेजिंगच्या सहाय्याने कंपन्या वा इतर उमेदवारांशी संपर्क करू शकत होते. 
कालांतराने ग्रुप्स, प्रश्नोत्तरे, अॅडव्हान्स्ड प्रोफाइल, रियल-टाइम अपडेट्सची सुविधा आदी बाबींची उपलब्धता या व्यासपीठाने करून दिली. 
सोशल मीडियाच्या इतर व्यासपीठांवर फोटो, व्हिडिओ शेअर करण्यावर भर असल्याचे आपण अनुभवू शकतो. 
‘लिंक्डइन’च्या व्यासपीठावर हा भर अनुभवायला मिळत नाही. त्याऐवजी आपल्या संपर्कामध्ये असलेल्या व्यक्तींच्या व्यावसायिक भागिदाऱ्या, व्यावसायिक प्रगती, बढत्या, संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत सुरू असलेल्या नानाविध योजना आपण या व्यासपीठावरून अनुभवू शकतो. 
या कंपनीने सन २००९ मध्ये भारतामध्ये एक स्वतंत्र कार्यालय सुरू केले. त्यानंतरच्या काळात या कंपनीने भारतीयांसाठी म्हणून काही विशिष्ट सेवांचीही सुरुवात केली. 
त्या आधारे भारतात या व्यासपीठाचा वापर करणारे ४ कोटी २० लाखांवर वापरकर्ते तयार झाले आहेत. 
या व्यासपीठाला वाढता प्रतिसाद पाहून सन २०१६ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘लिंक्डइन’च्या सर्व सेवा आपल्या छताखाली विकत घेतल्या.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा