![]() |
नेटवरून साभार |
अगदी मोजक्या शब्दांमध्ये, शब्दांमध्ये नाही तर मोजक्या अक्षरांमध्ये जगभरात संदेश पोहोचविणारी सुविधा म्हणून ‘ट्विटर’ ही मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट लोकप्रिय ठरली. मार्च २००६ मध्ये सुरू झालेल्या या वेबसाइटच्या सुविधा भारतामध्ये लोकप्रिय होण्यासाठी २००८ साल उजाडावे लागले. इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने झालेले बदल आणि सोशल मीडिया वापरण्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सवयींमध्ये झालेल्या बदलांमुळे जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या वेबसाइटला भारतीयांनीही लवकरच आपलेसे केले.
भारतामधील व्यवसायवृद्धीच्या शक्यतांचा विचार करत ट्विटर कंपनीनेही भारतासाठी विशेष धोरणे आखली. त्या अनुषंगाने केवळ स्मार्टफोन वापरणाऱ्यांपर्यंतच नव्हे, तर सुरुवातीच्या टप्प्यातील साधे फिचर फोन वापरणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीही ट्विटरने वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ट्विटरने आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. त्यानुसार, स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी मोबाईल अॅप, तर फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी डाएल-अप कनेक्शनच्या माध्यमातून एसएमएसद्वारे ट्विटरच्या सेवा पुरविण्याचे धोरण ट्विटरने अवलंबिले.
बेंगळुरू येथील ‘झिपडाएल’ या स्थानिक स्टार्टअपच्या मदतीने २०१४ च्या सुमारास ट्विटर इंडियाने ट्विटर एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून दिली. या सेवेच्या आधारे काही मोजक्या आणि महत्त्वाच्या ट्विटर अकाउंट्सवरून पुढे येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि माहितीही मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून पुरविण्यात येऊ लागली. त्यासाठी वापरकर्त्यांनी ट्विटरशी संबंधित क्रमांकावर केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे गरजेचे होते. त्यानंतर वापरकर्त्यांना मोबाईलवर एसएमएसच्या आधारे ट्विटर वापरणे शक्य झाले.
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये १४० अक्षरांमधील संदेशांची मर्यादा ट्विटरने सध्या वाढवून २८० अक्षरांपर्यंत नेली आहे. तसेच व्हेरिफाइड अकाउंटच्या माध्यमातून विशिष्ट व्यक्तीचे ट्विटर हँडल हे अधिकृत असल्याबाबतची निळी खूण ही ट्विटरकडून दिली जात आहे. ट्विटरकडून पुरविल्या जाणाऱ्या अशा नानाविध सोयी-सुविधांनाही भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा