‘गुगल’ने जानेवारी २००४ मध्ये ‘ऑर्कुट’ची सुरुवात केली होती.‘ गुगल’च्या सेवेत असलेल्या ऑर्कुट बयकटेन या तंत्रज्ञाने एका प्रकल्पासाठी म्हणून या व्यासपीठाची निर्मिती केली होती.
- प्रोफाईल, अल्बम, टेस्टिमोनिअल्ससारख्या सोयींच्या बरोबरीने वापरकर्त्यांच्या वेगवेगळ्या दिवसांच्या घडामोडींची-आठवणींविषयीची नोंद ठेवू शकणारी ‘स्क्रॅबबुक’ ही सुविधाही या व्यासपीठावर उपलब्ध होती.
- ‘फेसबुक’ लोकप्रिय होण्यापूर्वीच्या काळातील सोशल मीडियाचे नंबर एकचे व्यासपीठ म्हणून ‘ऑर्कुट’चा विचार केला जात होता.
- २००५ ते २००८ या दरम्यानच्या कालखंडामध्ये वय वर्षे १८ ते २५ या वयोगटातील व्यक्तींसाठी ‘ऑर्कुट’ हे एक हक्काचे व्यासपीठ बनले होते.
- भारतामध्ये साधारण त्या दरम्यानच्याच काळामध्ये डिजिटल सेवा वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ अनुभवायला मिळत होती.
- २००७ साली ‘गुगल’ने ‘ऑर्कुट’ वापरणाऱ्यांसाठी हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु या सहा भाषांचा समावेश केला होता.
- या दरम्यानच्या काळामध्ये ‘ऑर्कुट’वर जवळपास १८.७ दशलक्ष भारतीयांनी नोंदणी केली होती.
- २०१० पासून मात्र ‘फेसबुक’ने भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेत आपला भारतीय अध्याय सुरू केला.
- ‘गुगल’ने आपले स्वतःचे ‘गुगल प्लस’ हे सोशल मीडिया व्यासपीठ सुरू करण्याचा निर्णयही ‘ऑर्कुट’ला दुबळा करणारा ठरला.
- अखेर २०१४ मध्ये हे व्यासपीठ बंद करत असल्याची घोषणा ‘गुगल’ने केली.
- त्यापूर्वीच भारत आणि ब्राझिल या दोन देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या व्यासपीठावर जवळपास ३०० दशलक्ष व्यक्तींनी आपले सदस्यत्त्व नोंदविलेले होते.
२०१८ मध्ये ‘हॅलो’ या नव्या एका व्यासपीठाच्या आधाराने ‘ऑर्कुट’सारख्याच आणखी काही सुविधा घेऊन भारतीयांच्या सेवेत उतरत असल्याची घोषणा ‘ऑर्कुट’चा निर्माता ऑर्कुट बयकटेन याने केली. त्यासाठीची पूर्वतयारीही पूर्ण झाली आहे.
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf


chaan
उत्तर द्याहटवा