मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

भाई यू-ट्युब है तो सब कुछ है...

नेटवरून साभार
चॅड हर्ले, स्टिव्ह चेन आणि जावेद करिम यांनी अमेरिकेतील पेपल कंपनीसाठी ‘यू-ट्युब’ची निर्मिती केली होती. सुरुवातीपासूनच ‘यू-ट्युब’चे स्वरूप हे व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग साईट असेच राहिले आहे. करिम याने एप्रिल २००५ मध्ये तयार केलेला ‘मी अॅट द झू’ हा यू-ट्युबवरचा पहिला व्हिडिओ ठरला. या साईटला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत, २००६ साली ‘गुगल’ने ‘यू-ट्यूब’ विकत घेतले. त्यानंतरच्या काळात ‘यू-ट्युब’चा ‘गुगल’चीच एक सेवा म्हणून जगभरात प्रसार झाला. भारतामध्ये प्रत्यक्षात २००८ पासून ‘यू-ट्युब’च्या सेवा उपलब्ध होऊ लागल्या. ‘यू-ट्युब’च्याच अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरातील जवळपास ८८ देशांमध्ये आणि जवळपास तितक्याच भाषांमधील आशय यू-ट्युबवर उपलब्ध आहे. ही सेवा मुळात अमेरिकेपासून सुरू झाली असली, तरी सध्या अमेरिकेबाहेरील जगतामधून या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ कंटेन्ट उपलब्ध करून दिला जात आहे. स्थानिक भाषांमध्ये आशयनिर्मितीला मिळणारा वाढता प्रतिसाद विचारात घेत, ‘गुगल’पाठोपाठ यू-ट्युबनेही स्थानिक भाषांमध्ये असणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये २०१६ पासून यू-ट्युब स्थानिक भाषांमधील व्हिडिओ आपल्या होमपेजवरून उपलब्ध करून देऊ लागले आहे. त्यामुळे भारतातील यू-ट्युब वापरकर्त्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, तेलुगु, तमीळ या भाषांमधून उपलब्ध असणारे व्हिडिओ थेट होमपेजवर पाहण्याची सुविधा मिळू लागली आहे. त्यासाठी वापरकर्त्यांची ‘वॉच हिस्ट्री’ विचारात घेऊन, वापरकर्त्यांच्या आवडी-निवडी आणि ठिकाणाचा विचार करत त्या त्या भाषेमधील आशय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यू-ट्युबने सुरू केला आहे.   


(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

1 टिप्पणी: