महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागावात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यापूर्वी
- वामनदादा कर्डक
- बाबुराव बागूल
- डॉ. गंगाधर पानतावणे
- राजा ढाले
- अविनाश डोळस
- यशवंत मनोहर
- रावसाहेब कसबे
- उत्तम कांबळे
अशा दिग्गजांनी या संमेलनाचे अध्यक्षपदे भूषविली आहेत.
डॉ. भवरे यांचे मराठी साहित्यातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
- 'चिंताक्रांत मुलुखाचे रुदन',
- 'महासत्तेचे पीडादान'
- 'दलित कवितेतील नवे प्रवाह',
- 'मराठी कवितेच्या नव्या दिशा',
- 'दलित कविता आणि प्रतिमा'
'प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास' या ग्रंथाच्या संपादनासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङमयेतिहासाच्या आठ पुस्तकांचे संपादन डॉ. भवरे यांनी केले आहे. जागतिक मराठी भाषा गौरवदिनी (२७ फेब्रुवारी २०१९) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांचा 'मराठी दलित कवितेचा इतिहास' हा बृहद ग्रंथ प्रकाशित केला आहे. (सदर पुस्तक फोटोझिंको, (महाराष्ट्र शासन मुद्रणालय) पुणे येथे उपलब्ध आहे.)
डॉ. भवरे यांच्या कार्याचा गौरव करणारे काही विशेष उल्लेखनीय पुरस्कारात खालील नावे पुरस्कारांची नावे उल्लेखनीय आहेत.
- महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
- 'अनुष्टुभ प्रतिष्ठान'चा विभावरी पाटील पुरस्कार,
- मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार,
- प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार,
- विखे पाटील पुरस्कार,
- शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार,
- नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार,
- वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार
डाॅ. महेंद्र भवरे यांची संमेलनअध्यक्षपदी निवड झाल्याने मराठी साहित्य वर्तुळासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
9920789385
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा