![]() |
उस्मानाबाद येथील नियोजित साहित्य संमेलनाचा लोगो... |
हे माहिती नाही ना... मग वाचा...
ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन 'ज्ञानप्रकाश' (७ फेब्रुवारी १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद न्या. रानडे यांनीच भूषविले होते.
दुसरे साहित्य संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती.
१८८६ ते १९०४ दरम्यान कोणतेही साहित्य संमेलन झाले नाही.
तिसरे साहित्य संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो. टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र. पां. ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता.
चौथे साहित्य संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार या दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.
साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी
१. इ.स. १८७८ (पुणे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
इ.स. १८७९ ते इ.स. १८८४ (संमेलन नाही)
२. इ.स. १८८५ (पुणे) कृष्णशास्त्री राजवाडे
इ.स. १८८६ ते इ.स. १९०४ (संमेलन नाही)
३. इ.स. १९०५ (सातारा) रघुनाथ पांडुरंग करंदीकर
४. इ.स. १९०६ (पुणे) गोविंद वासुदेव कानिटकर
(मायाजालावरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा