@सुमीत_गुणवंत हे नव्या फळीतल्या तरुण कवींपैकी एक नाव.
छत्रपती शाहू प्रतिष्ठान गोवा यांच्या
संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर 2019 मध्ये गोवा येथे होणाऱ्या 'अंतरराज्यीय फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य
संमेलना'च्या मुख्य कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच सुमीत गुणवंत याची निवड झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. या संमेलनाला गोव्याचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोव्याच्या छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अनिल इब्रामपूरकर, संस्थापक परेश परमार आणि 'फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, डॉ. राजाभाऊ भैलुमे, डॉ. अरुण बुरांडे यांनी सुमीतच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.
सभोवतालचे सामाजिक वास्तव हा सुमीतच्या कवितेचा गाभा आहे.
सुमीत बरोबरच सागर काकडे याही नव्या दमाच्या कवीने 'तुमच्याही गोळीवर माझं नाव लिहा' म्हणत सामाजिक प्रबोधनाची सशक्त बाजू आपल्या कवितेतून मांडली आहे. सुमीत आणि सागर ही जोडगोळी शिवराय, तुकोबा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची व स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची कविता नव्या पिढीला देतील हा विश्वास आहे.
सुमीत एक कवितेत म्हणतोय,
"न्यायाच्या वाटेवर,
न्यायाची वाट पाहणाऱ्यावर
होणारा अन्याय...
जर जागतिकीकरणाचे डोळे लावलेल्या
देशाला दिसत नसेल..
तर ही महासत्ता नाही
ही डिजिटल मेकअप केलेल्या
देशाच्या आत्म्याची हत्या आहे.."
दुसऱ्या एका कवितेत सुमीत म्हणतो,
नऊ दिवस रंग उधळणार देवीला,
आणि खैरलांजीचा निषेध फक्त चवीला...?
म्हणून कितीही नाही म्हटलं
तरी कंबरे खालची भाषा
वापरावीच लागते
माझ्यासारख्या कवीला...
पुढच्या कवितेत सुमीत म्हणतो,
गावगाड्यावर बोलण्यापेक्षा
बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर...!!
आणि शनिवारवाड्याच्या पायरीपेक्षा
बसायला पाहिजे होतं फुले वाड्याच्या पायरीवर ....!
सुमीतच्या सामाजिक कविता जितक्या ताकदीच्या आहेत तितक्याच प्रेम कविताही शसक्त आहेत.
सामाजिक कवितेबरोबरच सुमीतच्या #ससा या 'प्रेम कवितेने' रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे.
या कवितेत कवी म्हणतो...
प्रेमाच्या सागरातला मी,
प्यासा मासा गं...
पडलं पडलं आभाळ,
मी भेदरलेला ससा गं...
...नेमक्या जागी नेमका तीळ,
भाजलेली हवरी गं..
हवरीसाठी मी हवरा,
तू लाजलेली नवरी गं..
माझा माझ्याव नाही राहिला भरवसा गं..
पडलं पडलं आभाळ मी भेदरलेल्या ससा गं..
सुमीतची 'ससा' ही प्रेम कविता यू ट्यूबवर ऐकण्यासाठी #ससा या शब्दावर क्लिक करा.
-------------------------------
सुमित गुणवंत
95 03 06 05 48

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा