सुरुवातीच्या काळातील सोशल मीडिया व्यासपीठांमध्ये ‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’ या वेबसाइटचा आपल्याला विचार करावा लागतो. दोन व्यक्तींमधील नातेसंबंध नेमका कशा स्वरुपाचा आहे हे स्पष्ट करू शकणाऱ्या ‘सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन’ या संकल्पनेचा आधार घेत ही वेबसाइट उभारण्यात आली होती. या संकल्पनेनुसार, जगातील कोणत्याही दोन व्यक्ती सहा किंवा त्यापेक्षा कमी मार्गांनी एकमेकांच्या नातेसंबंधांमध्ये जोडल्या जाऊ शकतात. आपल्याकडे सर्वसाधारणपणे एखाद्याची ओळख सांगण्यासाठी वापरले जाणारे मित्र, मित्राचा मित्र, ओळखीच्याचा ओळखीचा असे शब्द हे मार्ग सुचवित राहतात. मित्राचा मित्र, त्याचा मित्र अशी एक साखळी जोडल्यानंतर जास्तीत जास्त सहाव्या टप्प्यावर अगदी अनोळखी व्यक्तीही तुमचा मित्र बनू शकते, अशी कल्पना या संकल्पनेच्या मूळाशी होती. त्याचा आधार घेत माणसांना एकमेकांना जोडण्यासाठी आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सहा टप्प्यांवर सुविधा उपलब्ध करून देत ‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’ सुरू झाले होते. अमेरिकेमध्ये मूळ असलेल्या या सोशल मीडिया व्यासपीठावर पहिल्यांदाच वापरकर्त्यांना त्यांची माहिती इतरांसमोर मांडण्याची संधी मिळाली होती. मित्र- मैत्रिणींची यादी तयार करणे, व्यासपीठावर नसलेल्या बाहेरच्या व्यक्तीला या व्यासपीठावर जोडून घेण्यासाठी ई-मेल पाठविणे अशा सुविधा या वेबसाइटने उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र इंटरनेट वापराची तितकीशी सुविधा उपलब्ध नसल्याने अगदी मोजक्या काळामध्येच हे व्यासपीठ बंद पडले.
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा