शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

sixdegrres.com पहिली सोशल मीडिया सेवा


भारतामध्ये सोशल मीडिया वेबसाइट्सची सुरुवात २००० पूर्वीच अनुभवायला मिळाली होती. भारतात १९९७ मध्ये सुरू झालेली sixdegrres.com ही त्या अर्थाने पहिली सोशल मीडिया सेवा ठरली होती. मात्र सोशल मीडियाच्या वापराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली अनुभवायला मिळाली, ती ‘ऑर्कुट’च्या वापरानंतर. 
भारतात सोशल मीडिया वेबसाइट्स सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दहा वर्षांमध्ये सोशल मीडियाच्या विस्ताराची गती ही तुलनेने संथच होती. 
  • सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कॉम्प्युटरचा होणारा मर्यादित वापर आणि इंटरनेटच्या वापरासाठी होणारा तुलनेने जास्तीचा खर्च या कारणांमुळे त्या काळात इंटरनेट आणि त्यातही पुन्हा सोशल मीडिया वेबसाइट्सच्या वापरासाठी खर्च करणे, ही सर्वसामान्य भारतीय जनतेच्या दृष्टीने तशी चैनीची बाब बनत होती. 
  • कॉम्प्युटर आणि मोबाईलफोन तंत्रज्ञानामध्ये होत गेलेले बदल आणि या दोन वस्तूंचे झालेले सार्वत्रिकीकरण, इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये विस्तारासाठी सुरू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेमुळे इंटरनेट सुविधांचे कमी होत गेलेले दर, इंटरनेट वापरणे ही काळाची गरज असल्याची बाब जाणून घेतल्यानंतरच्या टप्प्यावर समाजामध्ये इंटरनेट साक्षरतेमध्ये होत गेलेली वाढ या बाबींमुळे मात्र नंतरच्या काळामध्ये इंटरनेट आणि पर्यायाने सोशल मीडिया व्यासपीठे वापरणाऱ्या भारतीयांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. 
  • त्यानंतर झालेला आणि होत असलेला सोशल मीडियाचा विस्तार सध्या रोज नवा इतिहास घडवित आहे. त्यापैकी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सोशल मीडिया व्यासपीठांची ओळख भागात करून घेणार आहोत. 

 उद्याच्या भागात वाचा 'सिक्स डिग्रीज डॉट कॉम' विषयी...

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #'सोशल_मीडिया' या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.

-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा