सोशल नेटवर्किंग साइट म्हणून सुरू झालेल्या ‘फ्रेंडस्टर’ने अल्पावधीतच जगभरात आपली पकड बनवली होती. फ्रेंडस्टरचा सर्वाधिक वापर करणाऱ्या जगभरातील पहिल्या पंधरा देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा होता. ऑनलाइन कॉन्टॅक्ट्स तयार करणे, या कॉन्टॅक्टसोबत माहिती आणि संदेशांची देवाण-घेवाण करणे, एकमेकांच्या फोटो, व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदविणे आदी सुविधा या वेबसाइटवर उपलब्ध होत्या. सन २००२ मध्ये सुरू झालेली ही वेबसाइट कालांतराने सोशल गेमिंग साइटमध्ये रुपांतरित झाली. या व्यासपीठाला असलेला वाढता प्रतिसाद आणि लोकप्रियता विचारात घेत ‘गुगल’नेही २००३ मध्ये ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. या साइटचा वाढता वापर आणि वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवणे अवघड बनल्याने या साइटवर तांत्रिक अडचणी वाढू लागल्या. त्यावर मात करण्यासाठी म्हणून या कंपनीने वापरकर्त्यांवर काही मर्यादाही घालायला सुरुवात केली. मात्र, त्याचा विपरित परिणाम होत गेला. २०११ मध्ये या कंपनीने सोशल गेमिंग साइट म्हणून पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र या क्षेत्रातील वाढती आव्हाने न पेलवल्याने जून २०१५ पासून ही साइटही बंद झाली.
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा