![]() |
| @ योगेश_बोराटे |
'जागल्या'वर आजपासून 'सोशल मीडिया: नवी दृष्टी, नवं भान' ही लेखमाला सुरू झाली आहे. ही लेखमाला प्रसारमाध्यमामध्ये मुशाफिरी करत असलेल्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. योगेश बोराटे यांच्या नुकत्याच मराठीतून प्रकाशित झालेल्या *'सोशल मीडिया'* या पुस्तकावर आधारित असेल.प्रा. बोराटे यांची 2018 साली 'विद्यापीठ विश्व' ही 45 विद्यापीठांची इत्यंभूत माहिती देणारी मालिका/सदर दै. लोकसत्तामध्ये गाजले होते.
'सोशल मीडिया' हे पुस्तक माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी जितके उपयुक्त आहे, तितकेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त ते मराठी भाषेतून सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठीही महत्त्वाचे ठरेल. या पुस्तकातील मजकूर हा भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तंत्रज्ञानाच्या या काळात समाजमाध्यमांच्या प्रसाराचा वेग अचाट आहे; मात्र सोशल मीडिया म्हणजे काय, असे विचारले तर अनेकांना सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचे इतर माध्यमांपेक्षा असलेले वेगळेपण, त्याची वैशिष्ट्ये, सोशल मीडियावरील आशयाची विविधता, हे माध्यम नेमके कसे वापरावे आदी मुद्द्यांबद्दल योगेश बोराटे यांनी ‘सोशल मीडिया’ या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे.

| सोशल मीडिया @ योगेश_बोराटे / अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव. |
सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवे भान या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोशल मीडिया समजून घेऊन त्याचा प्रभावी उपयोग कसा करायचा, हे या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. सोशल मीडियाचे वर्गीकरण, वैयक्तिक पातळीवरील फायदे व त्याचे दुष्परिणामही सांगितले आहेत. ‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’, ‘फ्रेंडेस्टर’, ‘हाय फाइव्ह’, ‘ऑर्कुट’, ‘फेसबुक’, ‘लिंक्डइन’ अशा सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांची ओळख करून देऊन त्यांचा दैनंदिन वापर, सामाजिक चळवळी व राजकीय वापर कसा केला जातो, हे यात नमूद करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबचे जग यातून उलगडण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

ग्रेट
उत्तर द्याहटवा