७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवणार आहात?...
पण, 'हे' नियम ठाऊक आहेत का?
73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो. राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ, हा झेंडा कसा तयार झाला?, झेंडा फडकवताना कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया...._
*_🇮🇳राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ_*
◼भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे.
◼पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.
◼हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे.
◼झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.
वाचकहो नमस्कार,

*_🇮🇳राष्ट्रध्वजासंबंधी नियम_*
◼भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे.
◼राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडापासून बनवला जावा असा सरकारी नियम आहे
◼ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा
◼ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
◼शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.
◼केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.
◼राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.
------------------------------------------------वाचकहो नमस्कार,
मागील काही महिन्यांपासून जागल्या वेबपोर्टलवर 'अर्थसाक्षरते'संदर्भातील लेखांना आपण भरभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. १५ ऑगस्टपासून 'सोशल मीडिया सर्व काही' ही लेखमाला सुरू करणार आहोत. ही लेखमाला प्रसारमाध्यमामध्ये मुशाफिरी करत असलेल्या प्रा. योगेश बोराटे यांच्या नुकत्याच मराठीतून प्रकाशित झालेल्या 'सोशल मीडिया' या पुस्तकावर आधारित असेल. या लेखमालेचेही आपण असेच स्वागत कराल, ही अपेक्षा.
आपली
जागल्या टीम
------------------------
------------------------
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा