![]() |
| @ योगेश_बोराटे |
‘सोशल मीडिया : स्वरुप और संभावनाएं’ या पुस्तकामध्ये डॉ. सुशील उपाध्याय सोशल मीडियाचे स्वरुप व त्याची वैशिष्ट्ये याविषयी माहिती देताता उपाध्याय म्हणतात, ‘’सोशल मीडियाची वैशिष्ट्ये हीच त्याची सर्वांत मोठी ओळख आहे. या माध्यमात वापरकर्ता हा माहितीचा निर्मातादेखील आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये मात्र निर्माता व वापरकर्ता दोन्ही वेगवेगळे समुह असतात. सोशल मीडियावर जो मजकूर असतो तो इथल्या वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो. हे सर्व लोक मिळून एक आभासी समाज (व्हर्च्युअल कम्युनिटी) बनवतात. या कम्युनिटीला कोणतंही भौतिक स्वरुप नसतं, हे विशेष. स्पर्शरुपामध्ये अनुभवण्याच्या बाबतीतही हे माध्यम आभासी आहे. याला एखाद्या वर्तमानपत्रासारखं प्रत्यक्ष हातात घेऊन पाहता येऊ शकत नाही. ’’
यामधून समोर येणारे काही समान मुद्दे सोशल मीडियाचे स्वरूप नेमकेपणाने समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या मुद्द्यांमध्ये इंटरनेट, वापरकर्त्यांनी स्वतः तयार केलेला आशय आणि या आशयाचा प्रवाहीपणा या बाबी आपण अधोरेखित करू शकतो. सोशल मीडियाचा वापर होण्यासाठी अपेक्षित असलेल्या आंतरक्रियांना (interactivity) मिळणारी चालना हे सध्या बहुतांश ठिकाणी वापरात असलेल्या वेब २.० या प्रकारातील, अर्थातच दुसऱ्या पिढीच्या इंटरनेट सुविधेचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. कॅप्लन आणि हैनलैन यांनी या प्रकारच्या इंटरनेटची वैशिष्ट्ये सांगताना म्हटल्यानुसार, या प्रकारामध्ये आशय आणि तो वापरण्यासाठीच्या वेगवेगळ्या सुविधांमध्ये (अॅप्लिकेशन्स) सातत्याने नवनवीन सुधारणा (अपडेट) होत राहतात. त्या कोणा एका व्यक्तीने विकसित केलेल्या न राहता, त्याचा वापर करणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या सहकार्याने ही प्रक्रिया सुरू राहते. त्यासाठी वापरकर्त्यांचा सहभाग आणि परस्पर सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरते. केवळ आशय प्रसिद्ध करणे हे वेब १.० च्या व्यासपीठावर होणारी क्रिया ठरत असे. त्याचवेळी परस्पर सहकार्याने सुरू राहणारे ब्लॉग हे वेब २.० च्या गटात मोडणारे असल्याचेही कॅप्लन आणि हैनलैन मानतात.
वापरकर्त्यांनी विकसित केलेल्या आशयाचे (युझर जनरेटेड कंटेंट) नानाविध प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. या प्रकारच्या आशयाची व्याख्या करण्यासाठी कॅप्लन आणि हैनलैन यांनी ‘ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंट’ या संस्थेने अशा आशयाबाबत घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली आहेत. त्यानुसार –
अ) इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांसाठी वा निवडक गटांसाठी असलेली उपलब्धता,
ब) केवळ दुसऱ्याने केलेले काम तसेच्या तसे दाखविण्याऐवजी त्यामध्ये काहीतरी सर्जनशील बदल वा सुधारणांचा असणारा समावेश,
क) कोणतेही व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता आणि संबंधित व्यक्तीच्या व्यावसायिक कार्याचा भाग न ठरणाऱ्या गटातील समावेश.
हे तीन निकष पूर्ण करणारा आशय हा सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी विकसित केलेल्या आशयाच्या गटात मोडतो, असे कॅप्लन आणि हैनलैन मानतात.
वाचा: सोशल मीडियाची वैशिष्ट्ये उद्याच्या भागात...
ता. क.:
काल दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळ, सप्तरंग मध्ये कुणाल गायकवाड यांनी प्रा. बोराटे यांच्या पुस्तकाविषयी मोजक्या व स्पष्ट शब्दात केलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे, त्याची लिंक आपल्यासाठी देत आहे.
https://www.esakal.com/ saptarang/kunal-gaikwad- writes-about-social-media- book-written-yogesh-borate- 208432
ता. क.:
काल दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळ, सप्तरंग मध्ये कुणाल गायकवाड यांनी प्रा. बोराटे यांच्या पुस्तकाविषयी मोजक्या व स्पष्ट शब्दात केलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे, त्याची लिंक आपल्यासाठी देत आहे.
https://www.esakal.com/
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा