सोशल मीडियाच्या दुष्परिणामांचा विचार करताना सोशल मीडियावरील आशय आणि सोशल मीडिया वापरण्याच्या सवयी या दोन प्रमुख स्वरुपांमधील दुष्परिणाम लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियाच्या वैशिष्ट्यांमध्ये वापरकर्त्यांनी स्वतः तयार केलेला आशय हा महत्त्वाचा मुद्दा म्हणून विचारात घेतला जातो. हेच वैशिष्ट्य या माध्यम प्रकाराच्या दुष्परिणामांनाही कारणीभूत ठरत आहे. हा माध्यमाचा नवा प्रकार असल्याने त्यामध्ये नवथरपणा, उठवळपणा येणे हे स्वाभाविक आहे.
या माध्यम प्रकारांच्या एकूण वापराचा विचार करता, ही माध्यमे ना सोशल म्हणावीत अशी, ना मीडिया म्हणावी अशी ठरतात. ही माध्यमे खासगी संवाद व्यवहारासारखी वापरली जात आहेत. सोशल मीडियासाठीचे पासवर्ड, वेगवेगळ्या सेटिंग या वैयक्तिक मर्जीनुसार ठरत असल्याने ही माध्यमे खासगी अभिव्यक्तीसाठीची माध्यमे ठरत आहेत. सोशल मीडियाचे स्वरुपही सुसंघटित, सुविहित नाही. प्रत्येक वापरकर्ता वैयक्तिक गरजेनुसार हे व्यासपीठ हव्या त्या पद्धतीने वापरतो.
सोशल मीडियावर तयार होणाऱ्या आशयाचे प्रमाण हे खूप जास्त आहे. सोशल मीडियामधील विविध व्यासपीठांची मालकी असणाऱ्या कंपन्यांना या आशयनिर्मितीवर, त्याच्या गुणवत्तेवर, त्याच्या सत्य-असत्यतेवर नियंत्रण ठेवणे आता जवळपास अशक्यच ठरत आहे.
सोशल मीडियावर तयार होणाऱ्या आशयाचे प्रमाण हे खूप जास्त आहे. सोशल मीडियामधील विविध व्यासपीठांची मालकी असणाऱ्या कंपन्यांना या आशयनिर्मितीवर, त्याच्या गुणवत्तेवर, त्याच्या सत्य-असत्यतेवर नियंत्रण ठेवणे आता जवळपास अशक्यच ठरत आहे.
- त्यामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच अलीकडच्या काळामध्ये या व्यासपीठांवरून होणारा गलिच्छ शब्दांचा वापर, सोशल मीडियाच्या आधाराने पसरणाऱ्या अफवांचे वाढते प्रमाण अनुभवायला मिळत आहे.
- सोशल मीडियाच्या मदतीने होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि सायबर क्राइमचे प्रकारही आता वाढत चालले आहेत.
- सोशल मीडिया वापरण्याच्या सवयी हा देखील आता अभ्यासकांच्या दृष्टीने संशोधनाचा विषय बनला आहे.
- माध्यम तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम म्हणून सध्याची पिढी ही ‘ऑलवेज ऑन’ या गटात येऊन बसली आहे.
- स्मार्टफोन वापरणारी ही पिढी या ना त्या कारणाने वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करत राहते. मात्र, या माध्यमांच्या सततच्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत चालल्याचे विविध संशोधनांमधून समोर आले आहे.
- या माध्यमांचा अतिवापर करणाऱ्या वा व्यसन जडलेल्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता, नैराश्य, निद्रानाश या समस्या दिसून येत आहेत.
- सोशल मीडिया वा सोशल गेमिंग वापरायला मिळत नसल्यास जाणवणारी प्रचंड अस्वस्थता, चिडचिड हे या दुष्परिणामांचेच स्वरुप आहे.
- सोशल मीडियाचा वापर करत नसताना वा गेम खेळत नसताना केवळ त्या विषयीचाच विचार करत राहणे हाही याचाच भाग असल्याचे मानसतज्ज्ञांचे मत आहे.
- अशा दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांनी आपापल्या अॅप्लिकेशन्समध्ये काही बदल केले आहेत. असे असले तरी या माध्यमांचा वापर वापरकर्त्यांच्याच हातात असल्याने, सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी वापरकर्त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे ठरणार आहे.
(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #'सोशल_मीडिया' या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा