पारंपरिक माध्यमांपेक्षा नव्या सोशल मीडियाची वेगळपण ही एकप्रकारची फिनिक्स भरारी म्हटले तर वावगे ठरू नये.
‘वापरकर्त्यांनी स्वतः तयार केलेला आशय’ हे समाजमाध्यमांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. पारंपरिक माध्यमांमधून होणारी आशयनिर्मिती ही प्रशिक्षित मनुष्यबळाच्या मदतीने होणारी शास्त्रशुद्ध प्रक्रिया ठरते. सोशल मीडियाच्या बाबतीत आशय थेटपणे मांडला जातो. कोणत्याही शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय आणि आशयाच्या नानाविध पैलूंची कोणतीही व्यापक माहिती नसलेले इंटरनेटचे वापरकर्ते ही माहिती थेट स्वतःच्या अकाउंटवरून मांडत राहतात. पारंपरिक माध्यमांमधून पुढे येणारा मजकूर हा बिनचूक, वस्तुस्थितीला धरून आणि कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मांडला जावा यासाठी संपादनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात. सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी संपादनाची ही प्रक्रियाच उपलब्ध नसल्याने, त्या आधाराने पुढे येणाऱ्या आशयाच्या सत्यासत्यतेविषयी, तसेच त्यामधून समोर येत असलेल्या मत-मतांतरांविषयीही सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहते. या विषयी भाष्य करताना माध्यमांचे अभ्यासक #विश्राम_ढोले सोशल मीडिया वापरणाऱ्यांची परिस्थिती ही ‘उघडले की-बोर्ड आणि लागले बडवायला,’ अशी असल्याचे मानतात. त्यामुळेच पारंपरिक माध्यमांसाठी संपादनाची मोठी व्यवस्था सातत्याने कार्यरत असते. सोशल मीडियासाठी अशा पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या सुविधा या अतिशय मर्यादित स्वरुपातच असल्याचे आपण अनुभवू शकतो. त्यामुळेच सोशल मीडियासाठी लेखन होत असताना, आपल्याकडे असणाऱ्या आशयाविषयी पूर्ण खात्री करून घेणे, त्याची विश्वासार्हता स्वतः तपासून पाहणे हे वापरकर्त्यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे ठरते.
पारंपरिक माध्यमांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी वेळेची गणितेही सोशल मीडियाच्या बाबतीत तशीच्या तशी लागू होत नाहीत. या गणितांविषयी माध्यमांचे अभ्यासक डॉ. सुशील उपाध्याय सांगतात,
सोशल मीडिया एकाचवेळी वैयक्तिक व सार्वजनिक (पर्सनल अँड मास मीडिया) माध्यम सुद्धा आहे. तांत्रिक मुद्दा बाजूला करून या माध्यमाकडे पाहिल्यास सोशल मीडिया ही काही नवी संकल्पना नसल्याचे लक्षात येते. व्यक्तिगत पातळीवर आपली कोणतीही सामुहिक कृती एक प्रकारचा सोशल मीडियाच आहे. या कृती मग लग्नकार्य वा अंत्यसंस्कारही असू शकतात. बागेत जमून हास्ययोग करणारे नागरिकसुद्धा सोशल व्यासपीठावरच असतात. आता यात केवळ एकच फरक झाला आहे तो म्हणजे सोशल मीडिया ‘फिजिकल लेव्हल’वरून ‘डिजिटल लेव्हलवर आला आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाची डिजिटल ओळख आहे. सोशल मीडिया याच आभासी प्रतिमेला आभासी जगात स्थान देतो.“ पारंपरिक माध्यमे वेळेच्या बंधनात आहेत. ग्राहकांनी काय ग्रहण करायचं, याबाबत ‘पॅसिव्ह’ आहेत. जो काही संवाद होतो तो एकतर्फी आहे. खरंतर, पारंपरिक माध्यमांना दुतर्फी संवादी माध्यमात बदलण्यासाठी प्रयत्न होत राहतात. परंतु, आजच्या सोशल मीडियासारखा तो दोन्ही बाजूंनी संवादी होऊ शकला नाही. पारंपरिक माध्यमांमध्ये वाचक, प्रेक्षक किंवा श्रोता यांना प्रतिक्रियेसाठी खूपचा मर्यादा येतात. यात जे काही मांडले जाते, ते तात्काळ ग्रहण करावे लागते. उदाहरणार्थ, जुन्या काळातील टीव्हीवर त्या वेळी जो कार्यक्रम प्रेक्षपित केला जात आहे, तो पुन्हा पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळत नसे.
सोशल मीडिया आणि नवमाध्यमांच्या अभ्यासक शालिनी जोशी यांच्यामतानुसार, “वर्तमानपत्र आणि टीव्ही-रेडिओच्या वाचक, प्रेक्षक किंवा श्रोते एका टोकापासून वाचायला, पाहायला किंवा ऐकायला सुरुवात करतात आणि शेवटपर्यंत पोहचतात. टीव्ही -रेडिओ तर खूप जास्त एकरेषीय आहे. तिथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत यावे लागते. पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत इंटरनेट आधारित माध्यमे रेषीय व अरेषीय या दोन्ही प्रकारे आशयाची उपलब्धता करून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. विविध लिंक्स, माहिती, एखाद्या आशयाला पूरक ग्राफिक्स, छायाचित्रे इत्यादी गोष्टींचा वापर इंटरनेटवर आधारित माध्यमांमध्ये विशेषत: सोशल मीडियामध्ये सहजशक्य होतो. यामुळेच सोशल मीडियात काम करणाऱ्यांनी आशयनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.
(#प्रा.योगेश_बोराटे यांच्या #'सोशल_मीडिया' या मराठी पुस्तकातून साभार.)
(#प्रा.योगेश_बोराटे यांच्या #'सोशल_मीडिया' या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा