आकाशवाणीच्या पुणे केंद्रात नुकताच आगळावेगळा निरोप समारंभ झाला.
निरोप देणार्यांनी आपल्या आठवणी जागवल्या,
काहींचे तर डोळे भरून आले.
ज्यांना निरोप दिला त्यांना तर काही बोलता येणंच शक्यच नव्हतं. काय घडलं नेमकं ? वाचा आणि ऐका हा वृत्तांत, आकाशवाणीच्या वृत्तविभागाचे उपसंचालक नीतीन केळकर यांच्या खास शैलीत...
काल दुपारी अख्खी पुणे आकाशवाणी कार्यालयाच्या अंगणात जमली होती. निमित्त होतं निरोप समारंभाचं. या अंगणात झाडं आहेत खूप. मोठमोठी. आकाशवाणीच्या पुणे केंद्रापेक्षाही जुनी. या झाडांनी इथल्या प्रत्येकाचं स्वागत केलं आहे, अनेक जण तर त्यांच्या साक्षीनं आले आणि गेले सुद्धा. झाडं मात्र तिथंच राहिली, नभोवाणीची अविट गाणी ऐकत. सावली देत. वृक्षवल्ली अम्हा सोयरी तुकोबा सांगुन गेलेत. झाडांना ऐकू नसेल आलं तेव्हाही आणि कालही दिसलं ही नसेल पण जाणवलं असेल नक्कीच.... त्यांना सोयरे मानणार्या या वास्तूतल्या माणसांचं प्रेम.... कारण निरोप समारंभ होता त्यांच्यासाठीच.... आता इथून मेट्रो जाणार आहे....ही झाडं काढली जातील लवकरच मुळासकट.... लावलीही जातील पुन्हा दुसरीकडे कुठेतरी.... बहरतीलही पुन्हा पण जेव्हा केव्हा वार्यावर स्वार होऊन आकाशवाणीचे सूर पोहोचतील त्यांच्यापर्यंत तेव्हा गाळतीलच दोन चार पानं... काल अनेकांच्या डोळ्यांतून टपटपलेल्या थेंबांसारखी.

(दि. 8 ऑगस्ट 2019 रोजीचा आकाशवाणी अंगणात रंगला सोहळा)

हा व्हिडीओ या लिंकवरही पाहता येईल. https://www.facebook.com/allindiaradionewspune/videos/358366395098017/
--------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

अतिशय सुंदर निरोप अश्रुनयनानी
उत्तर द्याहटवा