पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे भूषण असलेले माजी आमदार श्री. कृष्णराव भेगडे यांच्या 84 वा वाढदिवस इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. श्री. भेगडे यांनी अभिष्टचिंतनपर कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करून श्री. कृष्णराव भेगडे यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर परिसरात उद्भलेल्या पूरग्रस्तांसाठी तीन लाखाचा निधी व जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी रवाना केल्या...
"शिक्षण, शेती, आरोग्य आदी देश हिताच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करता आले. मावळच्या विकास कामांचा शिलेदार होता आल्याने, मी भरून पावलो आहे." असे उद्दगार मावळभूषण कृष्णराव भेगडे यांनी काढले. ते आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, तळेगाव दाभाडे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या चिंताजनक परिस्थितीत मदत करण्यासाठी संस्थेमार्फत तीन लाख रुपयांचा निधी व जीवनावश्यक वस्तू रवाना करण्याची जबाबदारी संस्थेचे सदस्य श्री. शैलेश शहा यांच्याकडे सोपविण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मुकुंदराव खळदे, श्री.गोरखभाऊ काळोखे, खजिनदार चंद्रकांत शेटे, कार्यवाह श्री. रामदास काकडे, श्री. शैलेश शहा, श्री. दीपक शहा, श्री. संजय साने, निरुपा कानेटकर, विलास काळोखे, सुरेश धोत्रे, माजी नगराध्यक्षा सौ. मायाताई भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलताई भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती अध्यक्षा निशा पवार, माजी उपनगराध्यक्ष श्री. गणेश काकडे, बाळासाहेब शेळके, महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एस. शिंदे, उपप्राचार्य, प्रा. अशोक जाधव, महाविद्यालय विकास समिती सदस्य, तळेगावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मावळ परिसरातील विविध संघटनांनी श्री. कृष्णराव भेगडे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
पुढे सत्काराला उत्तर देताना श्री. कृष्णराव भेगडे म्हणाले की, "सामाजिक कार्यात मी कधीही राजकारण येऊ दिले नाही. संस्था ह्या विचाराच्या पायावर उभ्या केल्या.
आज कोल्हापूर, सांगली सातारा या परिसरात पावसाने थैमान घातले आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण प्रत्येकानं या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन प्राध्यापक व उपस्थितांना केले. यावेळी संस्थेच्या वतीने तीन लाख रुपये निधी दिल्याचे श्री. भेगडे यांनी जाहीर केले. यापूर्वी केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपये निधी महाविद्यालयाने जमा केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मावळभूषण श्री. कृष्णराव भेगडे यांच्या संसदीय, सहकार, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय कारकीर्दचा आढाव घेतला. तसेच 'समाजचिंतन: श्री. कृष्णराव भेगडे गौरवग्रंथाचे' कार्य सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी खजिनदार श्री. चंद्रकांत शेटे यांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकताना नवीन नेतृत्व संधी आणि विकास यांचा परिचय करून दिला. तसेच श्री. कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा पुढील पिढीला इतिहास कळावा म्हणून यावर्षीपासून शालेय गट नववी-दहावी, महाविद्यालयीन पातळीवर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही नमूद केले.
श्री. दीपक शहा यांनी आपल्या मनोगतात भेगडे साहेब यांनी गोरगरीब विद्यार्थांना ज्ञानाची कवाडे खुली करून दिली. भेगडे साहेब म्हणजे मावळ तालुक्यातील जनतेसाठी एक प्रकारे दैवतच असल्याचा कृतार्थभाव त्यांनी व्यक्त केला.
आभार सौ. निरुपा कानिटकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले व सौ. विणा भेगडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा