‘८० सी’च्या अन्य पर्यायांतून सध्या जेमतेम 6 ते 8.3 टक्के इतकाच परतावा मिळत आहे. त्या दृष्टीने कर बचतीसाठी गुंतवणूक करताना ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) पर्याय स्वीकारणे निश्चितच फायदेशीर आहे.
संदर्भ: फोटो नेटवरून साभार
प्राप्तिकर बचतीसाठी ‘PPF’ प्रमाणे ELSS हा म्युच्युअल फंडाचा प्रकारही उपयुक्त आहे. या फंडांतील गुंतवणुकीवर ‘८०सी’ अंतर्गत कर वजावट मिळू शकते.
दर वर्षी जानेवारी महिना सुरू झाला, की प्राप्तिकर वाचविण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू होते. बऱ्याचदा घाईगडबडीत केवळ करबचत होतेय, म्हणून चुकीची गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. याचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्व लाईफ इन्शुरन्स कंपन्या एकूण व्यवसायाच्या सुमारे ७५ ते ८० टक्के व्यवसाय करतात. एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून आपण जेव्हा ‘सेक्शन ८० सी’ अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करणार असतो, तेव्हा प्रत्येक पर्यायाची माहिती घेणे गरजेचे असते. ‘८० सी’ अंतर्गत असलेल्या अनेक पर्यायांपैकी PPF हा पर्याय बहुतेक सर्वांना माहीत असतो. तथापि ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) हा पर्याय आजही बहुतेकांना तितकासा माहीत नाही.
ELSS हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रकार असून यातील दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक ‘८० सी’ नियमानुसार कर सवलतीस पात्र असते. अशाच प्रकारची सवलत PPF, NSC, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व कर बचत मुदत ठेव यांसारख्या गुंतवणुकीवर मिळत असते. याशिवाय गृहकर्जाच्या मुदलाच्या परतफेडीवरही अशी सवलत मिळत असते. तथापि ज्या प्रमाणात PPF, NSC, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व कर बचत मुदत ठेव यांमध्ये कर बचतीसाठी गुंतवणूक होताना दिसते, तशी ‘ELSS’ मध्ये होताना दिसत नाही, याचे कारण ‘ELSS’ बाबत माहिती नसणे हेच आहे. ‘ELSS’ मध्ये आपण कितीही गुंतवणूक करू शकता; मात्र केवळ एक लाख ५० हजारांपर्यंतची गुंतवणूक ‘८० सी’ अंतर्गत कर सवलतीस पात्र असते. या गुंतवणुकीस तीन वर्षांचा ‘लॉक इन पीरियड’ असतो. सुरुवातीची तीन वर्षे आपण यातली रक्कम काढू शकत नाही. तीन वर्षांनंतर रक्कम काढायलाच पाहिजे, असेही बंधन नाही. सर्व म्युच्युअल फंड ELSS ही सुविधा गुंतवणूकदारांना देऊ करतात. यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजारात केली जाते. त्यामुळे या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा शेअर बाजाराच्या परताव्याप्रमाणे कमी-अधिक होत असतो. असे असले, तरी शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून १५ ते १८ टक्के इतका परतावा मिळत असल्याचे दिसून येते. ‘८० सी’ च्या अन्य पर्यायांतून सध्या जेमतेम 6 ते 8.3 टक्के इतकाच परतावा मिळत आहे. त्या दृष्टीने करबचतीसाठी गुंतवणूक करताना ELSS पर्याय स्वीकारणे निश्चितच फायदेशीर आहे.
कर बचतीसाठी केवळ PPF किंवा NSC, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी अशा पारंपरिक पर्यायांचाच विचार न करता जास्तीत जास्त रक्कम ‘ELSS’ मध्येच गुंतविणे योग्य राहील. इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीसी वाटते, ती अशी, की आपण दर वर्षी एक लाख रुपये ‘PPF’ मध्ये सलग १५ वर्षे गुंतविले असतील, तर आतापर्यंत वेळोवेळी बदललेल्या व्याजानुसार आपली जमा झालेली रक्कम सुमारे ३० लाख रुपये इतकी झाली असेल. याउलट आपण एक लाख रुपये सलग १५ वर्षे ‘ELSS’ मध्ये गुंतविले असतील, तर आपली जमा झालेली रक्कम ५० लाख ते ७५ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
वरील विवेचनावरून असे लक्षात येईल, की प्राप्तिकर बचतीच्या उद्देशाने गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा ELSS हा एक अत्यंत फायदेशीर व सुलभ पर्याय आहे. याकडे दुर्लक्ष करणे निश्चितच हितावह नाही.
------------------------------------------------
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा