आर्थिक वर्ष आणि आर्थिक नियोजन भाग: 2
लेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०३ मिनिटे
मित्र हो,
आर्थिक वर्ष आणि आर्थिक नियोजन भाग: 1 मध्ये
आपण जीवनविमा (Life Insurance) व आरोग्य विमा (Health Insurance) या विषयी माहिती पहिली.
आज आपण 'आर्थिक नियोजनाची दुसरी व तिसरी पायरी यामध्ये 'पैसा साठवणूक' (Savings) याविषयी माहिती घेणार आहोत.
योगेश पवार
सेव्हिंग (Savings)
लहान पल्ल्याच्या ध्येयांसाठी म्हणजे घर चालवण्यासाठी दैनंदिन घरखर्च, वाहन व इंधन खर्च, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, पाहुणे आले-गेले त्यांचा खर्च, एखादी सहल, पार्टी, मनोरंजन, कर्जाचे हप्ते किंवा विम्याचे हप्ते, ह्यासाठी ठरावीक शिल्लक रक्कम मिळकतीतून बाजूला काढून साठवून ठेवली पाहिजे.
सेव्हिंग किती करावी?
सेव्हिंग करण्यासाठी विशिष्ट असा कोणताही फॉर्म्युला नाही. साधारण कमीत कमी १० % तरी सेव्हिंग करायला हवी. (फक्त सेव्हिंग, गुंतवणूक नाही.) जास्त सेव्हिंग करू नये. सेव्हिंग करून उरलेले पैसे गुंतवणुकीत टाकावे. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट (हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफेट ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते.) ह्यांच्या मते महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीमधून सर्वात आधी सेव्हिंग करावे, सेव्हिंग करून नंतर उरलेले पैसे खर्चकामासाठी उपयोग करावे. आपण आतापर्यंत उलटे म्हणजे पहिला खर्च मग त्यातून उरले तर सेव्हिंग असं करत आलोय की जे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचं आहे.
सेव्हिंग कुठे करावी?
मासिक ठरावीक रक्कम आपण बँकेत किंवा घरी ठेवावी, जेणेकरून कधीही गरजेनुसार काढता/ वापरता येईल. काही रकमेचे रिकरिंग (RD) चालू करावे त्यातून आपण विम्याचे हप्ते देऊ शकतो. ह्या पायरीमध्ये आपण रकमेच्या रिटर्न्सबद्दल विचार करू नये. ही सुद्धा शुद्ध साठवणूक आहे.
----------------------------------------------------------------------------------
आर्थिक नियोजनाची तिसरी पायरी म्हणजे
गुंतवणूक(Investment):
मध्यम किंवा मोठ्या पल्ल्याच्या ध्येयांसाठी जसे घर घेणे, लग्न कार्य करणे, परदेशी सहल, चारचाकी गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, वृद्धापकाळात पेन्शन ह्या गोष्टीसाठी वेगळी तरतूद असायला हवी. सेव्हिंग मधून वरील ध्येयं पूर्ण होऊ शकत नाही, कारण सेव्हिंग रक्कम मधून मिळणारा परतावा खूपच कमी असतो. महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत आहे. नुसत्या काही सेव्हिंगने आपली दीर्घ उद्दिष्टे पूर्ण करणे शक्यच नाही. म्हणून मार्केटमध्ये अश्या काही स्कीम्स आहेत, की ज्यामधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर काही ठिकाणी बिनदिक्कतपणे आपण गुंतवणूक करू शकतो आणि महागाईवर मात करून जास्ती रिटर्न्स मिळवून आपली ध्येयं पूर्ण करू शकतो.
गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?
कमी प्रमाणात बँक मुदत ठेवींचा पर्याय सुद्धा चांगला आहे. ह्यामध्ये रिस्क काहीच नाही, परंतु परतावा जास्ती मिळणार नाही. ७ टक्केच्या आसपास सामान्य रिटर्न्स मिळतील.
०१. म्युच्युअल फंड
०१. म्युच्युअल फंड
काही प्रमाणात म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवणूक करावी.
म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकीचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते.
म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकीचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते.
खरं म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे.
शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी ज्यांच्याकडे नॉलेज नसते, त्यांच्यासाठीचं 'म्युचुअल फंड' ही संकल्पना पुढे आली.
कारण म्युचुअल फंड मधील राशीचे नियोजन, व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ मंडळी, फंड मॅनेजर असतो.
इथे आपल्याला पैसे देण्याव्यतिरिक्त काहीच करायला लागत नाही.
तज्ज्ञ टीम आणि फंड मॅनेजर शेअर बाजारातील घडामोडींचा अभ्यास करून आपला पैसा योग्य ठिकाणी लावून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतात.
ह्यामध्ये कमी रिस्क, मध्यम रिस्क आणि जास्ती रिस्क अशी सुविधा आहे. SIP द्वारे ( सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)
आपण ठरावीक रक्कमेची गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. विशेष म्हणजे यात रिटर्न्स चक्रदरवाढ (कॉमपौंडिंग) पद्धतीने मिळते. म्हणून म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही लॉन्ग टर्म म्हणजे १० वर्ष , १५ वर्ष, २० वर्ष असेल तर भरपूर फायदा मिळवता येतो.
०२. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
काही रक्कम आपण निवृत्तीसाठी म्हणून आताच बाजूला काढून ठेऊ शकतो. त्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तरतूद करून ठेवावी. नियमित केलेल्या २०-२५ वर्षे गुंतवणुकीमुळे भरपूर असा निधी सहज जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं किमान १५ वर्षांचं असतं. ह्यामध्ये वार्षिक रु. १.५ लाख बचत करता येते. साधारण व्याजदर ८.२ टक्केच्या आसपास कमी-अधिक असतो, हे व्याजदर दरवर्षी बदलत असतात. कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात पीपीएफचे खाते उघडता येतं.
थोडी गुंतवणूक सोन्यामध्ये देखील करायला हरकत नाही. गोल्ड फंड मध्ये जास्त चांगले पर्याय आहेत. सोने/चांदी यातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काळजी घ्यावी.
०४. कंपनी शेअर्स
काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यास सुद्धा हरकत नाही, पण हे करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञ व्यक्ती ह्यांचे मार्गदर्शन जरूर घ्या. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याऐवजी दीर्घ काळासाठी शेअर खरेदी करून निवांत राहा. आतापर्यंत शेअरमार्केट १०० पासून ते २९००० पर्यंत गाठलेली पातळी वरून तुम्ही अंदाज लावू शकता, की बाजाराने किती परतावा दिला आहे.
०५. फक्त प्राप्तिकर बचतीसाठी:
इन्शुरन्स किंवा PPF घेऊ नका. हीच गोष्ट करणे चुकीचे आहे. त्याऐवजी इक्विटी, लिंक्ड, सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) आहेत. अशा योजनेमध्ये गुंतवणूक करून कलम 80 C अंतर्गत प्राप्तिकर वाचविता येतो आणि सोबत चांगला परतावा म्हणजे रिटर्न्स पण मिळतात. साधारण १७ टक्केच्या आसपास इतका घसघशीत परतावा ह्यामध्ये मिळतो .
आपली सगळी पुंजी एकाच क्षेत्रात गुंतवू नका, त्याचे वर्गीकरण करा आणि निश्चिंत राहा!
इथे मोजक्याच शब्दात आर्थिक नियोजन ह्या विषयावर काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. तर अश्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केले तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकता. पण हे लक्षात ठेवा की, असे नियोजन करताना कुटुंबातील सदस्यांचे आणि तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
------------------------------------------------------------------
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात
जागल्याच्या ‘अर्थसाक्षर' शाळा भाग-०६ मध्ये 'म्युच्युअल फंड: २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय'
या लेख मालिकेत...
या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com




Very good sir
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवा