बुधवार, ३ जुलै, २०१९

जागल्याची अर्थसाक्षर शाळा भाग-०६ म्युच्युअल फंड: २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय

म्युच्युअल फंड: २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय
लेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०४ मिनिटे 
योगेश पवार 
                                                                            मित्र हो,                                                    अजूनही आपण 

  • Fixed Deposit
  • Post  RD 
  • Insurance Policy 
  • Gold 
या ठरलेल्या पर्यायामध्ये पैसे गुंतवतोय पण जेव्हा कधी नवीन गुंतवणुकीचा पर्याय समोर आला की तो समजून न घेताच आपण नाकतोंड मुरडतो. त्यातल्या त्यात शेअर बाजार गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंड विषय आला की आपण नकारार्थी मान  हलवतो. 

आज काळानुसार जो बदलतो त्याला स्मार्ट बोलले जाते आणि जो बदलत नाही त्याला आऊट डेटेड बोलले जाते. गेल्या काही वर्षात आपल्याकडे झालेले बदल बघा...
घरात एक फोन ऐवजी आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आला आहे. 
घरातील Color TV ची ऐवजी आता LED  किंवा Smart TV आहे. 
घरामध्ये Air fresheners / Hand Sanitizes  असे नवीन Product  आले. 
हे सर्व का सांगतोय असे तुम्हाला वाटत असेल, पण एक सांगा आज आपण आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत का? बदल केले नाहीत? 
मला काही यातले जमणार नाही, मला म्युच्युअल फंड मध्ये कसे गुंतवायचे कळत नाही. आणि मग सगळीकडे स्वतःला स्मार्ट समजणारे आपण इथे परंपरागत चाललेल्या गुंतवणुकीवर आपण आपला पैसा गुंतवतो. मला फक्त एकाच सांगा आज तुम्ही जो स्मार्टफोन वापरताय तो कसा वापरायचा हे आपल्याला कोणी शिकवले का? नाही ना? तरी पण आपण सराईतपणे तो वापरताय ? कारण "If there is Will There is Way" या इंग्लिश म्हणी नुसार स्मार्टफोन वापरणे ही आपली आवड किंवा समाजातील स्टेटस होते. पण गुंतवणुकीच्या बाबतीत "जैसे थे वैसे ही रहेंगे" हा आपला दृष्टिकोन आहे. 
वरील परंपरागत चालत आलेल्या गुंतवणूक चुकीच्या नाहीत पण तुम्हाला स्मार्ट परतावा मिळणार नाही कारण वाढलेली महागाई त्यातला मोठा भाग काढून घेईल. म्हणून काळानुसार ज्याप्रमाणे आपण राहणीमान उंचावले त्याप्रमाणे आता गुंतवणुकीचीही पद्धत उंचावली पाहिजे. 

म्युच्युअल फंड: २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय का आणि कसा?
“सामान्य गुंतवणूकदाराकडे कौशल्य किंवा कौशल्याची क्षमता नसते आणि त्याच्याकडे भांडवल आणि थेट गुंतवणूकीसाठी वेळ नसतो आणि भांडवल आणि बाँड बाजारातील गुंतवणूकीचा मागोवा घेतो. म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सामान्य माणसांना उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम गुंतवणूक साधनांपैकी एक आहेत. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम तसेच गुंतवणूकी पोर्टफोलिओचे विविधतेचे उत्कृष्ट संधी मिळते. ” म्युच्युअल फंड योजनांच्या विविध श्रेणींमध्ये गुंतवणूकीद्वारे योग्य मालमत्ता वाटप होऊ शकते. “

Professional Management (व्यावसायिक व्यवस्थापन ) : 
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी  योग्य अनुभवी आणि कुशल व्यक्ती  असतात. ज्यांच्याकडे संशोधन करण्यासाठी टीम असते जी गुंतवणूकदारांचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करता येईल यावर सतत लक्ष देत असते. ज्याप्रमाणे एखाद्या दूरच्या प्रवासाला जाताना आपण हवाई प्रवास किंवा रेल्वेचा प्रवास करतो आणि ते चालवणाऱ्या वाहकावर  आपण विसंबून असतो, त्याच प्रकारची जबाबदारी म्युच्युअल फंड मॅनेजर पार पाडत असतात. 

Diversification (विविधता ) 
म्युच्युअल फंड मधील पैसा हा नावाप्रमाणेच एकत्रितरित्या  वेगवेगळ्या विविध पर्यायमध्ये गुंतवला जातो.  जसे शेअर्स, बॉण्ड, गव्हर्मेंटन्ट किंवा कंपनी FD. यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीतली जोखीम बऱ्यापैकी कमी होते. कारण जर समजा तुम्ही एक छोटे गुंतवणूकदार आहात आणि तुम्हाला पन्नास हजार शेअर्स मध्ये सरळ गुंतवणूक करायची असेल तर जास्तीत जास्त तुम्ही २-३ कंपन्यामध्ये गुंतवणूक योग्यरित्या करू शकता, पण जॉईंट ही जास्त असेल. पण म्युच्युअल फंडमध्ये सर्वांचा पैसा एकाच ठिकाणी असल्यामुळे तो विविध ठिकाणी गुंतवणूक करता येतो. 

Liquidity (तरलता ) 
म्युच्युअल फंड हे दीर्घ कालीन गुंतवणुकीचे साधन आहे. पण त्याच बरोबर म्युच्युअल फंड मध्ये Liquidity (तरलता ) खूप चांगल्या प्रकारची असते. सामान्य गुंतणूकदार जीवनात खूप वेळा अश्या परिस्थितीतून जातो की, तेव्हा त्याला त्याच्या गुंतवणूक केलेली रक्कमेची गरज पडू शकते. अश्या वेळेला  म्युच्युअल फंड सर्वात योग्य पर्याय आहे.  कारण इथे Liquidity (तरलता ) असल्यामुळे तुमची गुंतवणूक तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटला जमा होते. 

Transparency ( पारदर्शकता ) 
म्युच्युअल फंड मध्ये जगाच्या काना-कोपाऱ्यातून पैसा येतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या गुंतवणुकीचे काय झाले? किती खर्च आला? किती रुपयांनी परतावा मिळाला याची काळजी असते. म्युच्युअल फंड हे एक असे माध्यम आहे की, ज्यामध्ये मोठ्या स्तरावर पारदर्शकता असते. 

Regulation ( नियंत्रण ) सुरक्षित आणि पारदर्शक:
प्रत्येक म्युच्युअल फंड सेबीद्वारे व्यवस्थापित आणि नियंत्रित केला जात असल्याने, आपले गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे काळजी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सेबीमध्ये अनेक नियम आणि कायदेशीर फ्रेमवर्क आहेत जे आपले गुंतवणूकी एका अनुशासित पद्धतीने व्यवस्थापित केल्याचे सुनिश्चित करतात. आता हे खरे आहे की प्रत्येक गुंतवणूक काही जोखमींच्या अधीन आहे, तथापि, मजबूत बाजार ज्ञान आणि विविधीकरणासह मूलभूतपणे ध्वनी सिक्युरीटीजवर आधारित सुज्ञ निवडीमुळे अशा जोखमींचे संरक्षण करण्यात आणि आपल्या गुंतवणूकीवर उच्च परतावा मिळविण्यात मदत होऊ शकते.

कमी खर्चिक:
कॅपिटल मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्याच्या तुलनेत, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना कमी खर्चाच्या गुंतवणूकीचा फायदा देतात. बहुतेक स्टॉक पर्यायांना सुरुवात करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते तर दुसरीकडे म्युच्युअल फंडांना 500 रुपये दरमहा कमी करुन गुंतवणूकदार दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूकीतून लाभ मिळवू शकतात.

भारतातील काही अग्रगण्य  म्युच्युअल फंड कंपन्या: 
  • HDFC MF
  • ICICI MF
  • SBI MF
  • RELIANCE MF
  • BIRLA SUN LIFE
  • DSP BLACK ROCK
  • IDFC MF
  • MOTILAL OSWAL MF
  • UTI MF
  • SUNDARM BNP



--------------------------------------------
- योगेश पवार 
(Pawer Financial Services, Ahmednagar) 
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59 
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता. 
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. 
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. 
उद्या भेटू यात 
जागल्याच्या ‘अर्थसाक्षर' शाळा भाग-०७  मध्ये  'संपत्ती निर्मितीसाठी  म्युच्युअल फंड उपयुक्त' या लेख मालिकेत... 
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा. 
mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा