आर्थिक वर्ष आणि आर्थिक नियोजन भाग: 1
मित्र हो,
आर्थिक वर्ष आणि आर्थिक नियोजन भाग: 1 मध्ये आपण जीवनविमा (Life Insurance) व आरोग्य विमा (Health Insurance) याविषयी माहिती घेणार आहोत.
१. आर्थिक नियोजन करणे म्हणजे नेमके काय करणे?
आपल्या गरजा, ध्येय, उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय.
२. आर्थिक नियोजन का करावे?
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहते, अशी संकटे व्यवसायात, कुटुंबात येऊ शकतात. जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो. हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने स्वतःचे आर्थिक नियोजन केलेचं पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट आणि अगदीच नकोसा वाटणारा आहे. आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु करालं तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात ह्याचे फायदे नक्की मिळतील. हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी हे आपण बघूया.
बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यावर आर्थिक नियोजन अवलंबून असते. ते म्हणजे वय, उत्पन्न, उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न आणि उपलब्ध शिल्लक. इतरही बरेच मुद्दे आहेत पण वर दिलेली प्रमुख आहेत.
आर्थिक नियोजन करावयाची तीन पायरी संकल्पना पुढीलप्रमाणे:
जीवन विमा (Life Insurance) व आरोग्य विमा (Health Insurance)
सेविंग्स (Fund Saving)
गुंतवणूक (Investment )
आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येकाचा जीवन विमा (Life Insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) हा प्रत्येकाचा असलाचं पाहिजे. विचार करा, जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर काय संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल. वाढती महागाई, त्यात खाणारी २-३ तोंडे, लहान मुले असतील तर त्यांचे संगोपन, त्यांचं शिक्षण, वडिलधारी लोकांचे आजारपण, नंतर मुलांचं लग्न कसं होणार? हे सर्व प्रश्न आ वासून उभे राहतील, म्हणूनच सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे काळाची आजची गरज आहे.
जीवनविमा घेताना नेहमीचा प्रचलित जीवनविमा घेण्यापेक्षा 'टर्म इंश्युरन्स' घ्यावा. हा एक अतिशय सोपा व साधा प्रकार आहे. यात फिक्स असा वार्षिक कमी हप्ता भरावा लागतो आणि विमेदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसाला विम्याची एकरकमी रक्कम मिळते. ह्यात एक गोष्ट फार महत्त्वाची असते, ती म्हणजे विमा संरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम विमेदारास मिळत नाही. आपलं पहिले लक्ष्य म्हणजे शुद्ध विमा असला पाहिजे, परताव्याचा विचार ह्या पायरीवर करू नका. विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करू नका.
जीवनविमा किती रकमेचा असावा ?
साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवनविमा ३० लाखाचा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६/७ हजार रुपयांचा कायम स्वरूपी प्रीमियम भरावा लागतो.
जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे, जेणे करून वार्षिक प्रीमियम कमी भरावा लागतो. ज्या कंपनीचा विमा घेताय त्याचा क्लेम सेटलमेंट Ratio जास्त असेल असाच बघून घ्यावा. दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार (Nominee) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही रकमेचा घेता येतो. ह्या संदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.
आरोग्य विमा:
जीवन विम्यानंतर आरोग्यविमा देखील महत्त्वाचा आहे . ह्याचे कारण म्हणजे वाढत चाललेला रुग्णालयातील महागडा औषधोपचार आणि नवनवीन उद्भवलेले आजार…! त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्यविमा असणे गरजेचे आहे. आपला आरोग्यविमा किमान ४-५ लाखांचा तर असावाच. ह्या मध्ये विमा कंपनी कुठे कुठे सुविधा देते, कोणकोणते आजार समाविष्ट आहेत, कोणते नाही आहेत, नो क्लेमचा फायदा, महिलांसाठी मॅटर्निटी सुविधा देतायेत की नाही, आजारापूर्वी आणि नंतर किती दिवसाचा खर्च स्वीकारणार, चालू आजाराचे खर्च करणार की नाही ह्या बाबी तपासून घ्याव्यात. आरोग्य विमा एकट्यासाठी किंवा कुटुंबासाठी एकत्रित (फ्लोटर प्लॅन) घेता येतो.
------------------------------------------------
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
मित्र हो,
आर्थिक वर्ष आणि आर्थिक नियोजन भाग: 1 मध्ये आपण जीवनविमा (Life Insurance) व आरोग्य विमा (Health Insurance) याविषयी माहिती घेणार आहोत.
योगेश पवार
केवळ एका वर्षाचेच नव्हे तर आयुष्य भराचे पुढील आर्थिक नियोजन करणे आणि समृध्द जीवन जगणे, हे दूरदृष्टी असलेले लोक करतच असतात, मात्र काहींना साधे एका वर्षाचे, अहो साधे सहा महिन्यांचेही आर्थिक नियोजन करता येत नाही. त्यासाठी या काही खास टिप्स... वाचा पूर्ण लेखात...१. आर्थिक नियोजन करणे म्हणजे नेमके काय करणे?
आपल्या गरजा, ध्येय, उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय.
२. आर्थिक नियोजन का करावे?
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहते, अशी संकटे व्यवसायात, कुटुंबात येऊ शकतात. जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो. हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने स्वतःचे आर्थिक नियोजन केलेचं पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट आणि अगदीच नकोसा वाटणारा आहे. आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु करालं तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात ह्याचे फायदे नक्की मिळतील. हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी हे आपण बघूया.
बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यावर आर्थिक नियोजन अवलंबून असते. ते म्हणजे वय, उत्पन्न, उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न आणि उपलब्ध शिल्लक. इतरही बरेच मुद्दे आहेत पण वर दिलेली प्रमुख आहेत.
आर्थिक नियोजन करावयाची तीन पायरी संकल्पना पुढीलप्रमाणे:
जीवन विमा (Life Insurance) व आरोग्य विमा (Health Insurance)
सेविंग्स (Fund Saving)
गुंतवणूक (Investment )
आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येकाचा जीवन विमा (Life Insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) हा प्रत्येकाचा असलाचं पाहिजे. विचार करा, जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर काय संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल. वाढती महागाई, त्यात खाणारी २-३ तोंडे, लहान मुले असतील तर त्यांचे संगोपन, त्यांचं शिक्षण, वडिलधारी लोकांचे आजारपण, नंतर मुलांचं लग्न कसं होणार? हे सर्व प्रश्न आ वासून उभे राहतील, म्हणूनच सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे काळाची आजची गरज आहे.
जीवनविमा घेताना नेहमीचा प्रचलित जीवनविमा घेण्यापेक्षा 'टर्म इंश्युरन्स' घ्यावा. हा एक अतिशय सोपा व साधा प्रकार आहे. यात फिक्स असा वार्षिक कमी हप्ता भरावा लागतो आणि विमेदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसाला विम्याची एकरकमी रक्कम मिळते. ह्यात एक गोष्ट फार महत्त्वाची असते, ती म्हणजे विमा संरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम विमेदारास मिळत नाही. आपलं पहिले लक्ष्य म्हणजे शुद्ध विमा असला पाहिजे, परताव्याचा विचार ह्या पायरीवर करू नका. विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करू नका.
जीवनविमा किती रकमेचा असावा ?
साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवनविमा ३० लाखाचा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६/७ हजार रुपयांचा कायम स्वरूपी प्रीमियम भरावा लागतो.
जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे, जेणे करून वार्षिक प्रीमियम कमी भरावा लागतो. ज्या कंपनीचा विमा घेताय त्याचा क्लेम सेटलमेंट Ratio जास्त असेल असाच बघून घ्यावा. दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार (Nominee) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही रकमेचा घेता येतो. ह्या संदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.
आरोग्य विमा:
जीवन विम्यानंतर आरोग्यविमा देखील महत्त्वाचा आहे . ह्याचे कारण म्हणजे वाढत चाललेला रुग्णालयातील महागडा औषधोपचार आणि नवनवीन उद्भवलेले आजार…! त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्यविमा असणे गरजेचे आहे. आपला आरोग्यविमा किमान ४-५ लाखांचा तर असावाच. ह्या मध्ये विमा कंपनी कुठे कुठे सुविधा देते, कोणकोणते आजार समाविष्ट आहेत, कोणते नाही आहेत, नो क्लेमचा फायदा, महिलांसाठी मॅटर्निटी सुविधा देतायेत की नाही, आजारापूर्वी आणि नंतर किती दिवसाचा खर्च स्वीकारणार, चालू आजाराचे खर्च करणार की नाही ह्या बाबी तपासून घ्याव्यात. आरोग्य विमा एकट्यासाठी किंवा कुटुंबासाठी एकत्रित (फ्लोटर प्लॅन) घेता येतो.
------------------------------------------------
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात
जागल्याच्या ‘अर्थसाक्षर' शाळा भाग-०5 'आर्थिक वर्ष व आर्थिक नियोजन भाग-२' या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा