बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

सेलिब्रेशनची नाही तर आता अधिक जागृत राहण्याची वेळ


भारताने पाकिस्तानवर मंगळवारी पहाटे हवाई हल्ला केल्यानंतर पहाटेपासूनच त्याबाबतचे सर्व इतिवृत्त, अपडेट सोशल मिडियावर क्षणाक्षणाला धडकू लागले. सोशल मिडियावर पोस्टचा पाऊस पडला, त्यामुळे नवं असं सांगण्यासाठी वृत्तपत्रांकडे काहीच उरले नव्हते. मात्र सोशल मिडियावरच्या माहितीच्या महासागरातून फेक पोस्ट वेचून बाजूला काढून सत्य माहिती संकलित करून ती लोकांपुढे संयतपणे, भावनेचा आवेग बाजूला ठेऊन मांडण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांना करावा लागतो, त्यामुळे त्यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते.

कालच्या घटनेबाबत
वृत्तपत्रांनी पुढील प्रमाणे हेडलाइन्स केल्या..


*लोकसत्ता : पाकिस्तानवर हवाई हल्ले


*सकाळ : घुसून मारले

*लोकमत : अद्दल


*महाराष्ट्र टाइम्स : बदला

*The hindu : India bombs jaish camp in Pakistan balakot


*Indian express : India strieks terros deep in pak


*Times of india : India avenging force


*Dawn : Pakistan vows response to india at time and place of our choosing


विविध वृत्तपत्रात अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी या हवाई हल्ल्यांबाबत विस्तृतपणे विश्लेषण केले. त्यामध्ये निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन लोकमतमधील त्यांच्या लेखात म्हटलेलं वाक्य खूपच महत्त्वाचं आहे.
ते म्हणजे 'सेलिब्रेशनची नाही तर आता अधिक जागृत राहण्याची वेळ' याचे भान प्रत्येक भारतीयाने बाळगण्याची गरज आहे.

त्याच्या पुढे जाऊन लोकसत्ता मधील अग्रलेखात संपादक म्हणतात
"सूड, बदला वगरे भावना या मुत्सद्देगिरीच्या पहिल्या पायरीवर असतात. तेथून पुढे जाणे हे सामान्य भक्तांना अशक्य असेल. पण ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याच्याकडे पुढे जाण्याची क्षमता हवीच हवी. ‘‘सुडाची भावना प्रामुख्याने अशक्त व्यक्त करतात,’’  असे आईन्स्टाईन म्हणत असे. ते सत्य आहे. म्हणून या सूडभावनेच्या दबावास बळी न पडता भारत सरकारने केलेल्या संयत कृतीचे महत्त्व आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा