शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

मॉरिशसमध्ये पहिल्यांदाच अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


           
फोटो: नेटवरून साभार...

01 ऑगस्ट हा 'अण्णा भाऊ साठे' यांचा जन्मदिवस. 2019-20 हे वर्ष 'अण्णा भाऊ साठे' जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यांनी आपली 'फकिरा' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केली आहे.

फोटो डावीकडून:
 डॉ. विजयकुमार खंदारे, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, प्रा. डॉ.मनोहर जाधव, डॉ. नागनाथ कोतापल्ले , आबासाहेब थोरात, मा. उत्तम कांबळे आदी मान्यवर
मॉरिशस येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करताना उपस्थित असलेले श्रोते

'अण्णा भाऊ साठे हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्याप्रमाणेच इतिहासाचे एक चकाकणारे पान आहे. अण्णा भाउंनी देवाच्या मालकीचे जग हे माणसाच्या मालकीचे केलं, ही त्यांच्या विचारांची मोठी ताकद आहे' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. ते काल 'फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार संमेलन भोर आणि मराठी भाषक संघ, मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 
                     मा. उत्तम कांबळे
मॉरिशसमध्ये अण्णाभाऊ साठे अशी जयंती अशा प्रकारे साजरी ही पहिलीच आहे. 
यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले होते. कार्यक्रमाची सुरुवातीला नाशिकच्या स्वप्ना थोरात यांनी 'बुद्ध कबीर भीमराव फुले' हे गीत सादर केले तर प्रा. डॉक्टर निशा भंडारे यांनी 'माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली' या अण्णा भाऊंच्या छक्कड वर अभिनय सादर केला. 
'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली'
या 'छक्कड'वर अभिनय सादर करताना  
प्रा. निशा भंडारे, पुणे

अण्णा भाऊंना नीट समजून घेऊन कृती करण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन कोत्तापल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. 
डॉ. नागनाथ कोतापल्ले
तर कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. यावेळी 60 पेक्षा जास्त अभ्यासक उपस्थित होते.
---------------------------------------------------
- डॉ. संदीप रतन कांबळे

२ टिप्पण्या: