बुधवार, १७ जुलै, २०१९

गुंतवणुक: सुखी आयुष्याची गुरुकिल्ली.

 
  योगेश पवार
                  लेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०४ मिनिटे 
गुंतवणूक करताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला हवी की, गुंतवणुकीवर जे व्याज आपल्याला वर्षाअखेरीस मिळते ते महागाई दरापेक्षा नेहमी जास्त असायला हवे. सरासरी महागाई दर ६-८ % इतका असतो. म्हणजेच जर या वर्षी तुम्ही एखादी वस्तू १०० रुपयाला विकत घेत असाल, तर त्याच वस्तूची किंमत एकावर्षा नंतर १०६ /१०८ रुपये इतकी असेल.

आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायला हवे की, साठवलेले पैसे आणि गुंतवलेले पैसे यात फरक आहे. साठवलेले पैसे कधीच वाढत नाहीत, याउलट त्यांची किंमत दिवसेंदिवस कमी होत असते म्हणूनच आपण गुंतवणूक करणे आवश्यक असते. योग्य गुंतवणुकीने पैसे वाढतात आणि आपण महागाईला तोंड देऊ शकतो.
                   संदर्भ: महाजालावरून साभार.

ज्या वेगाने महागाई वाढते आणि घरच्या गरजांसोबत मागण्या देखील वाढतायत त्या वेगाने आपला पगार किंवा व्यवसाय वाढत नसतो आणि मग आपल्याला सुखसोयीच्या वस्तुसाठी EMI अर्थात हफ्ता भरावा लागतो.

बऱ्याचदा पगार बँकेच्या खात्यात आल्याआल्या देणी आणि EMI चालू होतात आणि महिन्या अखेरीस पुन्हा खिसा खाली होतो. जर त्या महिन्यात काही अधिक खर्च निर्माण झाले की मग आपली पंचाईत होते. अशा वेळेस आपल्याला योग्य गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.

गुंतवणूक नेहमी अशा ठिकाणी करावी जी सरकार मान्य असेल आणि कमीत कमी वर्षाला ८-१० टक्क्याच्या वरच व्याज मिळवून देईल. चांगल्या गुंतवणूकीनेच आपण आपले आणि आपल्या परिवाराची स्वप्ने सत्यात आणू शकू.

पण जास्त पैसे कमविण्याचा नादात आपण चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतो. लालसेपोटी कोणत्याही अनधिकृत ठिकाणी पैसे गुंतवू नये. जिथे पैसे दुप्पट करून देण्याची खात्री दिली जाते. ती सर्व फसवणूक असते. तुम्हाला खोटी स्वप्ने दाखवली जातात आणि पैसे घेऊन ती व्यक्ती पळून जाते, तर अशा गोष्टींना बळी पडू नये आणि जाणकार माणसाकडूनच माहिती घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्र तपासून पाहणे आवश्यक असते.
--------------------------------------------------
- योगेश पवार 
(Pawer Financial Services, Ahmednagar) 
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59 
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता. 
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. 
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. 
उद्या भेटू यात  जागल्याच्या लेख मालिकेत... 
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा. 
mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा