चायनीज बांबू (ट्री) ची उंची होते ती 80 ते 90 फूट आणि ते टिकते पण शंभर वर्ष...
अाता तुम्हाला प्रश्न पङला असेल की, या चायनिज बांबुचा आणि गुंतवणुकीचा काय संबंध?
खरं तर बांबू म्हणजे गवत, पण या प्रकाराला चीनमध्ये Tree असे म्हणतात, कारण पण तसंच आहे. याची होणारी वाढ... त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा...चीनमध्ये एक शेतकरी होता. त्याला त्याच्या मित्राने बांबूची लागवड करण्याकरिता त्याचे बीज दिले अाणि हे सांगितले की ,"एक लक्षात ठेव, हे बीज तुझ्या जीवनात समृद्धी अाणेल, पण हा प्रयोग तुझी कठीण परीक्षाही घेईल, तू पास झाला तर माञ तुझ्या अायुष्यातील बरेच अार्थिक प्रश्न कमी होतील हे नक्की"
त्या शेतकऱ्याने उजाड माळावर त्याचे बीज लावले आणि त्याच्या मित्रांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक बीजाजवळ मार्किंग करून त्यांना रोज पाणी दयायला सुरुवात केली.
पाणी देऊन आठ दिवस झाले तरी काहीच हालचाल दिसेना. तो रोज जाई आणि मार्किंग केलेल्या ठिकाणी पाणी देई, बरेच दिवस झाले पण काहीच हालचाल दिसेना.
पाणी - खत .... खत... परत पाणी असे करत करत १ वर्ष झाले, तरीही कसलाच कोंब दिसेना, अाता त्याचे घरचे लोक पण त्यास म्हणू लागले, "या बीजाचं काहीच होणार नाही, तुमचा निर्णय चुकला, तुम्ही हे सगळ उखङुन टाकुन दुसरे पीक लावा."
पण तो ठाम राहिला कारण त्याच्या कानात त्याच्या मित्राचे शब्द गुंजत होते, की, "हे पीक तुझी परीक्षा घेईल."
तो मात्र रोज जाई... त्या माळ रानावरील मार्किंग केलेल्या ठिकाणी पाणी देई, वर्ष दुसरे, तिसरे, चौथे... सरले ... पण काहीच नाही.
अाता माञ लोकांनी त्याला वेडयात काढायला चालू केले. लोकांनी त्याला या कर्मापासून परावृत्त करायला चालू केले. त्यात त्याचे आपली माणसं पण होती.
पण हा चालत राहिला कोणाचही काहीही मनावर न घेता, नित्य नेमाने पाणी टाकत राहिला. असे करता करता चार वर्षे सरली...
वर्ष पाचवे:
……आणि अचानक एक दिवस सर्व मार्किंग केलेल्या ठिकाणावरून एक - एक फुटाची रोपे बाहेर आलेली,
ते पाहून तो अचंबित झाला.
आख्ख गाव ते बघायला बाहेर आलं.
दुसऱ्या दिवशी रोपांची उंची दुप्पट, तिसऱ्या दिवशी चौपट...
सर्वच जण अचंबित आणि पुढच्या पाचच आठवड्यात त्या बांबुनी 90 फुट उंची गाठली.
संदर्भ: महाजालावरून साभार.
"तू हे कसं केलंस"? हे विचारणार्यांची रांगच त्या शेतकर्याच्या घरी लागली.
वरील कथा ही फक्त कल्पना विलास नव्हे... तर चीन मधील एक सत्यकथा आहे.
चायनीज बांबू (ट्री) जमिनीच्या बाहेर यायला पाच वर्ष घेतो, पण एकदा का बाहेर आला की, फक्त पाच आठवडयात 90 फुटाची उंची गाठतो.
आपल्या म्युचलफंडाच्या एसअायपीचं पण असच काहीस असतं.
भलेही पाच वर्ष कागदावर काहीही दिसत नसले तरी त्या एसअायपीच्या बांबूची मुळे जमिनीत पसरत असतात. *अापली एसअायपी ही हळुहळु अापल्या एनएव्हीची काॅस्ट अॅवरेजींग करत असते, पाॅवर अाॅफ कंम्पाऊंङीगची कमाल दाखवण्यासाठी पङत्या बाजारात युनिट्स खरेदी करत असते. पण अापण एवढ्या खोलवर विचार करत नाही. निश्चयाला ठाम रहात नाही. म्युचलफंङाच्या सल्लागाराचा "दीर्घकाळ गुंतवणुक करा" हा मोलाचा सल्लाच विसरुन जातो अाणि योजनेत गुंतवणुक करने बंद करतो. योजनेतून पैसे काढुन घेतो किंवा योजना तरी बदलतो.
एसअायपी ही काही बॅंकेची, पोस्टाची रिकरिंग ठेव नाही की, एक-दोन वर्षातच उगवेल, ती एक तपश्चर्या अाहे, एका तपानंतरच तिचे चांगले परिणाम दिसतील. तोपर्यंत धैर्य, संयम व सातत्य हे दाखवायलाच हवे.
म्हणुन गुंतवणुकदारांनो ...
सुरुवातीच्या काळात जरी काही दिसले नाही, तरीही निरुत्साही होऊ नका, पाणी देत रहा, खत देत रहा आणि ज्या दिवशी निकाल येईल. त्या दिवशी जगाचे डोळे दिपतील. वेळ लागेल पण अापली भांङवल वृद्धीचे काम नक्की होणार, यात शंकाच नाही. बाकी... तुमच्या या दीर्घ प्रवासासोबत अाम्ही अापले सारथी अाहोतच.
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा