शुक्रवार, २८ जून, २०१९

'जागल्याची अर्थसाक्षर शाळा'- भाग -03 बचत करताना या चुका टाळा..... By Yogesh Pawer

बचत करताना या चुका टाळा... 

'जागल्याची अर्थसाक्षर शाळा'- भाग -03  बचत करताना या चुका टाळा..... By Yogesh Pawer

आपले आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. काहीजण  दूरदृष्टी ठेवतात तर काहीजण आला दिवस ढकलतात. अशावेळी बचत व गुंतवणूक करणे अनिवार्य ठरते. मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन व चोख व्यवस्थापन असणे आवश्यक ठरते.
बचत करताना कोठे व कशी करावी 
याचे पुरेसे ज्ञान नसल्याने म्हणा 
किंवा गुंतवणुकीचे चांगले पर्याय माहिती नसल्याने अनेक जणांकडून पुढील चुका घडतात. या चुका टाळणे गरजेचे आहे. 
---------------------------------------------------

०१. ध्येेयाचा अभाव ध्येेय व योजना निश्चित केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळू शकत नाही. बचतीला देखील हा नियम लागू पडतो. अनेक जण कोणत्याही नियोजनाशिवाय गुंतवणूक करतात. मात्र आपल्याला नेमेक काय व किती हवे आहे, तसेच याची कालमर्यादा काय याचा विचार अनेक जण करत नाहीत. त्यामुळे निवृत्ती, मुलांचे शिक्षण-लग्न आदी महत्त्वाच्या प्रसंगी हातात फार कमी रक्कम येते. त्यामुळे आर्थिक उद्दिष्टांची निश्चिती करून त्यानुसार बचत करणे आवश्यक असते.

०२. अर्थनिरक्षरता 
अधिकृत आर्थिक शिक्षणाच्या  अभावामुळे अनेक लोकांना आर्थिक ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व, रोख प्रवाह व कर्ज व्य्वस्थातपन, विमा योजना आणि संबंधित कृतींबाबत माहिती नसते. मर्यादित माहितीमुळे किंवा तोकड्या ज्ञानामुळे चुका होऊ शकतात. पण विशिष्ट आर्थिक स्थितीच्या सर्वांगीण अवलोकनाचा अवलंब करत योजनेच्या अभावाला सक्रिय प्रतिसाद देता येऊ शकतो. त्यासाठी आर्थिक साक्षरता असणे खूप गरजेचे आहे.

०३. वेळेची मर्यादा
अनेक जण कामाच्या ठिकाणी अधिक वेळ व्यतीत करत असल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यांच्याकडे कमी वेळ उपलब्ध असल्यामुळे त्यांना स्वतःच्या आर्थिक नियोजन करण्याळसंदर्भात विचार करायला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामत: सर्वसामान्य लोक त्यांच्या व आसपास असलेले सीए, सहकारी, कुटुंब, मित्र, बँका यांच्यां सल्यावरून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. म्हणूनच त्यांच्याबाबत गुंतागुंतीच्यां उत्पा्दनांमध्ये गुंतवणूक केल्याचे दिसून येते.
०४. अवास्तव खर्च आणि त्यासाठी कर्ज
ध्ये्य पूर्ण करण्यायसाठी कर्ज घेणे आणि घेतलेल्यात कर्जाचे हप्ते‍ चुकवणे अशा मानसिकतेमुळे बँकिंग आणि रिकव्हरीज एजन्सीजचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. भारतातील परिस्थिती पाहता नागरिकांचे बचत करण्याचे प्रमाण उच्च आहे, परंतु त्यात काळानुरूप लक्षणीय घट होत आहे. साधारणत: उच्च व स्थिर उत्पन्न, असताना देखील लोकांचा खर्च आणि कर्जांचा त्यांच्याच उत्पचन्नांवर भार पडतो.

०५. अपुरा विमा
विमा हे गुंतवणुकीचे साधन किंवा कराची बचत करणारा एक पर्याय आहे. आज बाजारात अनेक विमा कंपन्या आणि त्यांचे एजेंट यांचा सुळसुळाट असल्याचे आपल्या लक्षात येते. अनेक लोक जानेवारीपूर्वी करबचत करत नाहीत. ज्यामुळे विमा हा लाभ घेण्यासाठी सुलभ पर्याय बनतो. मित्र व कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेला चुकीचा सल्ला मिळाल्याने मोठ्या रक्कमेचा हप्ता असूनही अनेकांना अपुरे विमाकवच मिळते. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या, गंभीर आजारांसाठी विमाकवच, वंध्यत्व विमाकवच, उत्प‍न्न‍ संरक्षण किंवा सामाजिक लाभ नसणे या गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत.


०६. रिअल इस्टेंटमध्ये स्वारस्य 
अनेक जण रिअल इस्टेटटला अधिक प्राधान्य् देतात. गुंतवणुकीचे सर्वोत्तम क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले जाते. या व्यतिरिक्त असा समज आहे की बाजारपेठेमधील एक वेगळे क्षेत्र असल्यामुळे रिअल इस्टेयट उच्चित  परतावा व कर लाभ देते. म्ह्णून अनेकजण रिअल इस्टेअटमध्येळ गुंतवणूक करतात आणि उच्च लाभ प्राप्त करतात. परंतु हा अत्यंत धोकादायक समज आहे. खास करून रिअल इस्टेटमध्ये मंदी असताना त्यातील गुंतवणूक अत्यंत धोकादायक पर्याय बनतो.
०७ कर नियोजन 
कर नियोजन हे कर कमी करण्या्चे उत्तोम साधन आहे, असेही अनेकांना वाटते. प्राप्तिकर खात्याची दिशाभूल करण्यासाठी ते कमी उत्पसन्न किंवा सहेतूक चुकीचा ताळेबंद दाखवतात. करपश्चात उत्पन्न वाढवण्याासाठी कर नियोजनाचे योग्ये ध्येय समजून घेतल्यास ही स्थिती टाळता येऊ शकते.
--------------------------------------------------
- योगेश पवार 
(Pawer Financial Services, Ahmednagar) 
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59 
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता. 
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. 
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. 
उद्या भेटू यात 
जागल्याच्या ‘अर्थसाक्षर' शाळा भाग-०4 'आर्थिक वर्ष व आर्थिक नियोजन' या लेख मालिकेत... 
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा. 
mejagalya@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा