![]() |
जागल्या |
गेल्या वर्षभर 'जागल्या' या ब्लॉगवर आपण सतत प्रेम दाखवले आहे. यावर प्रसिद्ध झालेल्या विविध विषयांवरील लेखमालेवर आपण भरभरून प्रेम केले. वेळोवेळी सूचना, मार्गदर्शनही केले आहे. आपल्या या प्रेमापोटी आम्हाला आणखी नवीन काहीतर करण्यासाठी बळ मिळाले. याचाच एक भाग म्हणून काल 26 जानेवारी 2020 रोजी कष्टकऱ्यांचे नेते म्हणून सर्वज्ञात असलेले आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते 'जागल्या' या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. आता जागल्याचा नवीन लोगो, अधिकृत वेबसाईट वरीलप्रमाणे असेल. जागल्यावर तुम्हीही आता लिहू शकता, बोलू शकता. आपल्या शोधक लेखमालेला, नवीन पुस्तकांना प्रसिद्धी देऊ शकता. आपल्या नाविन्यपूर्ण बातमी, माहितीलाही प्रसिद्धीस देऊ शकता. त्यासाठी आम्हाला खालील मेलवर संपर्क करू शकता.
जागल्याच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा...
![]() |
'जागल्या' वेबसाईटचे प्रकाशन करताना डॉ. बाबा आढाव आणि 'जागल्या'चे संपादक दीपक जाधव, संदीप कांबळे व जागल्या टीमवर प्रेम करणारे श्री. नितीन पवार, राहुल वाणी, अमोल, व श्रीकांत मिश्रा... |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा