आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो. मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?
वॉरेन बफे म्हणतात, “झोपेत असतांना सुद्धा पैसा कसा वाढेल, याचा मार्ग शोधला नाही तर मरेपर्यंत काम करावे लागेल.” त्यासाठी वाचा
SIP: संपत्ती निर्मितीच्या राजमार्गाची गोष्ट...
काल सायंकाळी आदित्यचा फोन आला. मी निवांत टीव्ही बघत होतो. त्यावर नुकतीच ‘म्युच्युअल फंड्स सही हैं ‘ ही जाहिरात चालू होती. तिकडून आदित्य वैतागून म्हणाला , “माझी SIP बंद करून टाका. दीड वर्षे बघतोय. कुठलाही आकर्षक परतावा दिसत नाही. किमान भरलेले पैसे तरी कमी होऊ नयेत, तेही नाही. कशाला हवी अशी गुंतवणूक? त्यापेक्षा पोस्टल आरडी बरी!”
आदित्यची मानसिकता बघता मी त्याला, “दुसऱ्या दिवशी कार्यालयात ये असे सुचविले.” दुसऱ्या दिवशी आदित्यला पुन्हा SIP नक्की कशी काम करते, हे सांगणे क्रमप्राप्तच होते.
आदित्य पुण्याच्या एका नामवंत आयटी कंपनीत मानवी संसाधन विभाग व्यवस्थापक (HR Manager) म्हणून उत्तम पगारावर कार्यरत होता. मात्र आर्थिक नियोजनभान त्याला अजिबातच नव्हते.
मी आदित्यला म्हणालो,
आदित्य समजा तू दर महिन्याला ठराविक तारखेला दहा हजार रुपयांची सोने खरेदी करतोय.
उदा. जानेवारी (सोने भाव रु..२९,००० तोळा),
फेब्रुवारी ( रु. ३०,००० तोळा),
मार्च (रु.२६००० तोळा) व
एप्रिल (रु. २७५०० तोळा)
अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर तुझी खरेदी झालेय. यात तुझी सर्वात आकर्षक खरेदी कोणती?
आदित्य,
“अर्थातच मार्च मधील २६००० रुपये तोळा! ही खरेदी सर्वात फायद्याची.” आदित्यने उत्साहाने उत्तर दिले.
त्याचे “कारण? ” मी प्रश्नार्थक पध्दतीने विचारले.
आदित्य म्हणाला,
“सरळ आहे , गोल्ड मार्केट डाउन असले तर कमी भावात झालेली खरेदी जास्त सोने (grams) देईल.
मी म्हणालो,
“येस आदित्य , एकदम बरोबर , त्याच प्रमाणे शेअर बाजारही डाउन असेल तर त्याचा परिणाम म्युच्युअल फंड युनिट एनएव्ही (NAV) वर होतो व हे युनिट्स कमी भावात खरेदी करणे ही सुद्धा एक सुवर्णसंधी असते. आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याकरिता योग्य वेळ दिली की संपत्ती निर्माण होते.”
“मला उदाहरणांसह सांगा.” आदित्यने पुन्हा बाऊन्सर टाकला.
“एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ‘एचडीएफ इक्विटी फंड’ ही योजना १ जानेवारी १९९५ रोजी सादर करण्यात आली. त्यावेळी तिचा एनएव्ही (NAV) (एका युनिटची किंमत / Net Asset Value ) रु. १० होता. आज ३१ मे २०१९ रोजी या योजनेचा NAV रु. ६९६.४७१० आहे.
जर एखाद्या व्यक्तीने दरमहा ५००० रुपयांची सीप या योजनेत २४ वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल तर त्यांना योजनेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत या योजनेने चक्रवाढ व्याजदराने २०.२७ % या दिलेल्या परताव्याने रु. ५००० प्रतिमाह याप्रमाणे २४ वर्षांच्या रु. १४,४०,००० /- या गुंतवणूकीचे मूल्य आज रु. २,७१,५७,९०३ /- एवढे झाले आहे.”
मी ‘तो सूर्य, हा जयद्रथ ‘ या अभिनिवेशात ऑनलाईन आकडेवारी आदित्यला सादर केली. आता मात्र आदित्यच्या सर्व शंकांना सविस्तर उत्तर मिळाले होते. मी आदित्यच्या आर्थिक नियोजनाचा पुन्हा एकदा आढावा घेतला व त्याला त्याच्या दोन्ही मुलांमुलींचे शिक्षण, लग्न व त्याची सेवानिवृत्ती याचा प्लॅन सादर केला.
SIP बंद करायला आलेल्या आदित्यने याच मिटिंग मध्ये ‘इएलएसएस (ELSS) या कर वाचविणाऱ्या ‘एसआयपी’मध्येही गुंतवणूकीचे निर्णय घेतले.
SIP मध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे:
1. चक्रवाढ गतीची शक्ती (Power of Compounding):
नियमित गुंतवणूक होत असल्यामुळे मिळणाऱ्या फायद्याची पुनर्गुंतवणूक होत असते. गुंतवणूक अधिक फायदा, या दोन्हीवर पुन्हा उत्पन्न चालू होते. म्हणून शक्यतो लवकर गुंतवणुकीस सुरुवात करा, म्हणजे चक्रवाढ गतीचा फायदा मिळेल.
2. आर्थिक गुंतवणुकीस शिस्त (Discipline):
दर महिन्याला आपण विशिष्ट रक्कम सिपच्या मध्यमातून गुंतवणूक करत असतो. याचा अर्थ आपल्या गुंतवणुकीस एक विशिष्ठ शिस्त लागते. कारण दर महिन्याला ही रक्कम भरणे बंधनकारक असते, त्यामुळे गुंतवणूकीस प्राधान्य मिळते.
3. सरासरीचा फायदा (Rupee Cost Averaging):
म्युचुअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारा जोखमीच्या अधीन असते. म्हणजे त्यात चढ- उतार होत असतो. प्रत्येक गुंतवणुकीत आपणास त्या फंडाचे युनिट्स मिळतात. प्रत्येकवेळी समान गुंतवणुकीस युनिट्सची एनएव्ही (NAV) ही वेगळी असल्यामुळे युनिट्स कमी-अधिक मिळतात.
4. कर बचत (Tax saving):
दीर्घ मुदतीच्या ‘इएलएसएस’ गुंतवणूक योजनेमध्ये कर लाभ मिळतो.
5. सुलभता (Convenience):
यामध्ये मार्केटच्या वेळेतच गुंतवणूक करावी असे काही बंधन नसते. आपण ही रक्कम आपल्या बचत खात्याला जोडून घेऊ शकतो. Electronic clearance – ECS (Auto debit facility) म्हणजे प्रत्येकवेळी भरणा करण्याची किंवा भरणा चुकण्याची चिंता राहत नाही. आपण पोस्ट डेटेड चेकनेही सिप करू शकतो.
6. छोट्या गुंतवणुकदारासही फायदा:
यामध्ये अगदी ५०० रुपये दर महिन्याला भरून सहभागी होता येते.
7. पद्धतशीर गुंतवणूक योजना:
“थेंबे थेंबे तळे साचे” याप्रमाणे चांगले जीवन जगण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडे गरजेइतकी संपत्ती निर्माण व्हावी, यासाठी आपण सिप योजना अंगिकारली पाहिजे. दर महिन्याला येणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूक करून परतावा चांगला मिळावा; यासाठी हे गरजेचे आहे. रुपये ५०० किंवा १००० इतक्या कमी रकमेची सिप (SIP) चालू करून आपण गुंतवणूक करू शकतो.
यामधून नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते. आणि कमी रकमेमध्ये आपला पोर्टफोलिओ तयार व्हायला सुरुवात होते. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे? आपण दर महिन्याला किती रक्कम गुंतवणार आहोत? हे ठरवा. मगच गुंतवणुकीला सुरुवात करा.
SIP गुंतवणूकीचे महत्वाचे टप्पे:
१. आपले आर्थिक उद्दिष्ट ठरवा.
२ .त्यासाठी दर महिन्याला किती रक्कम भरणार आहोत, हे आर्थिक नियोजकाच्या मदतीने ठरवा.
३. विविध योजनाचा अभ्यास व मागील परतावा तपासून योग्य योजना निवडा.
४. या योजनेचा अर्ज आणि एसआयपी मॅनडेट अर्ज, रक्कम आणि तारीख नक्की करा.
५. पेमेंट पर्यायाची निवड करा. (चेक किंवा ECS)
६. दीर्घकालीन संपत्ती निर्माणसाठी गुंतवणूक करा. यामध्ये चक्रवाढगतीचा आणि सरासरीचा फायदा होतो.
७. एकापेक्षा अधिक योजना निवडल्यास पोर्टफोलिओमध्ये विविधता येते.
८. वर्षातून किमान एकदा तुमच्या आर्थिक नियोजकाबरोबर मिटिंग करा व आपले उद्दिष्ट्ये व योजना यांचा आढावा घ्या.
बिल गेट्स म्हणतात,
“गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमचा दोष नाही. परंतु गरीब म्हणून मेलात तर मात्र, दोष तुमचाच आहे.”
जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो. मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.

---------------------------------------------------
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsap p.com/IogFFXsbTDq5xG 5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा