‘जागल्या’ या शब्दाचा अर्थ आहे पहारेकरी. पूर्वीच्या काळी गावामध्ये रात्री गस्त घालणाऱ्यांना जागल्या असं म्हटलं जायचं. या जागल्यांमुळे सर्व गावकरी सुखाची झोप घेऊ शकत होते.
समाजात आजही अनेक जागल्या कार्यरत आहेत. प्रशासनाचा भष्ट्र, निष्क्रीय कारभार, समाजातील अपप्रवृत्ती, वंचित घटकांवर होत असलेला अन्याय याविरोधात पहारा देण्याचे काम हे 'जागल्या' करत आहेत. मात्र अशा जागल्यांची संख्या ही खूप अल्प आहे.
आम्ही आमच्या पातळीवर जागल्या बनण्याचा, जागल्या म्हणून काम करीत असणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा व युवा जागल्या घडविण्याचा प्रयत्न करू इच्छित आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळाची गरज आहे
- टिम जागल्या
mejagalya@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा